इंदापूरच्या लोढा परिवाराकडून तीनशे कोविड रुग्णांना डब्बा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:10 IST2021-05-16T04:10:27+5:302021-05-16T04:10:27+5:30

उपजिल्हा रुग्णालयात शुक्रवारी सकाळी मायेच्या डब्ब्याच्या वाटपाची सुरुवात धरमचंद लोढा व डॉक्टरांच्या हस्ते करण्यात आली. या वेळी नगरसेवक ...

Three hundred Kovid patients from Lodha family of Indapur | इंदापूरच्या लोढा परिवाराकडून तीनशे कोविड रुग्णांना डब्बा

इंदापूरच्या लोढा परिवाराकडून तीनशे कोविड रुग्णांना डब्बा

उपजिल्हा रुग्णालयात शुक्रवारी सकाळी मायेच्या डब्ब्याच्या वाटपाची सुरुवात धरमचंद लोढा व डॉक्टरांच्या हस्ते करण्यात आली. या वेळी नगरसेवक प्रशांत शिताप, महेंद्र गुंदेचा, प्रकाश बलदोटा, बाळासाहेब शिरसागर, संजयकुमार बोरा, योगेश बोरा, विवेक लोढा, विपुल लोढा, श्रीकांत मखरे, युवा क्रांती प्रतिष्ठानचे अध्यक्ष दशरथ भोंग, डॉ. विनोद राजपुरे, डॉ. सुहास शेळके, वसंत फलफले उपस्थित होते. या वेळी उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर, परिचारिका, आरोग्य कर्मचारी कोरोना रुग्णांना अहोरात्र सेवा देत असल्याने, त्यांना नगरसेवक प्रशांतदादा शिताप परिवाराच्या वतीने गुलाबपुष्प, मास्क व रुचकर भोजन देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. त्याचबरोबर रुग्णांना, त्यांच्या नातेवाईकांना जेवण, शुध्द पाणी बॉटल व एन-९५ मास्क वाटप करण्यात आले.

१५ इंदापूर लोढा

इंदापूर उपजिल्हा रुग्णालयात कोरोना रुग्णांना तीनशे डब्बे मोफत देण्यात आले.

Web Title: Three hundred Kovid patients from Lodha family of Indapur