शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

वाघोलीत तिघे बुडाले ; आई मुलाला वाचवण्यासाठी गेलेली व्यक्तीही बुडाली 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2020 19:59 IST

माय-लेकांचा मृतदेह शोधण्यासाठी बोट व ग्रामस्थांच्या मदतीने अग्निशमन प्रयत्न केले परंतु हाती काही लागले नाही. परंतु अद्यापही अग्निशामक दल लोणीकंद पोलीस व ग्रामस्थांच्या मदतीने शोध कार्य काम चालूच आहे.

पुणे (वाघोली) : वाघोली-भावडी रस्त्याच्याकडेला असणाऱ्या भैरवनाथ तळ्यामध्ये माय-लेक व त्यांना वाचविण्यासाठी गेलेला एकजण असे तिघेजण बुडल्याची घटना मंगळवारी (दि. २१) दुपारी अडीचच्या सुमारास घडली. तिघांपैकी वाचविण्यासाठी गेलेल्याचा मृतदेह मिळाला असून माय - लेकांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. दत्तात्रय रघुनाथ जाधव (वय ४०, रा. भैरवनाथ तळ्याशेजारी), रोहिणी संजय पाटोळे (वय ४०, रा. पाटोळे वस्ती), स्वप्नील संजय पाटोळे (वय १३, रा. पाटोळे वस्ती)  असे तळ्यामध्ये बुडालेल्या तिघांची नावे आहेत. तिघांपैकी दत्तात्रय जाधव यांचा मृतदेह सापडला असून माय-लेकांचा मृतदेह काही मिळाला नाही.प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार, रोहिणी पाटोळे या मुलगा स्वप्नील व मुलगी साक्षीसह भैरवनाथ तळ्यामध्ये गोधड्या धुण्यासाठी आले होते. अल्फा होम्स सोसायटीच्या बाजूकडील पिचिंगवर गोधड्या धुण्याचे काम चालू असताना स्वप्नील हा पाण्यामध्ये पाय घसरून बुडत होता. त्याला वाचविण्यासाठी आईने देखील पाण्यात उडी घेतली. दोघेही बुडत असल्याचे पाहून त्यांना वाचविण्यासाठी भैरवनाथ मंदिराच्या बाजूने दत्ता जाधव यांनी तळ्यामध्ये उडी मारली. दोघांना वाचविण्यासाठी जात असताना जाधव दम लागून तळ्यामध्ये बुडाले तसेच माय-लेक देखील तळ्यामध्ये बुडाले आहेत. प्रत्यक्षदर्शींनी सदरचा प्रकार ग्रामस्थांना सांगितल्यानंतर पोलीस व अग्निशमन दलाला बोलविण्यात आले. 

पीएमआरडीए अग्निशमन जवानांनी गळाच्या सहाय्याने तिघांचा शोध घेण्याचा प्रयत्न केल्यानंतर साडे चार वाजण्याच्या सुमारास दत्तात्रय जाधव यांचा मृतदेह मिळाला. माय-लेकांचा मृतदेह शोधण्यासाठी बोट व ग्रामस्थांच्या मदतीने अग्निशमन प्रयत्न केले परंतु हाती काही लागले नाही. परंतु अद्यापही अग्निशामक दल लोणीकंद पोलीस व ग्रामस्थांच्या मदतीने शोध कार्य काम चालूच आहे.

टॅग्स :wagholi/lonikand policeवाघोली/लोणीकंद पोलीसdrowningपाण्यात बुडणेDeathमृत्यूCrime Newsगुन्हेगारी