शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

Pune: वडगावमधून तीन लहान मुले झाली बेपत्ता, परिसरात मोठी खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2023 17:19 IST

सीसीटीव्ही फुटेजच्या सहाय्याने तपास केला जात आहे...

वडगाव मावळ (पुणे) : माळीनगरमधून तीन लहान मुले अचानक बेपत्ता झाली आहेत. याबाबत वडगाव पोलिसात तक्रार दाखल केली असून, परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. याबाबत अज्ञात इसमाविरोधात तक्रार दाखल केली असून, पोलिस निरीक्षक कुमार कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथके वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन तपास करत बेपत्ता मुलांचा शोध घेत आहेत. सीसीटीव्ही फुटेजच्या सहाय्याने तपास केला जात आहे.

स्वाती विजय रसाळ (वय ३० वर्षे, रा. माळीनगर) यांनी वडगांव पोलिसात तक्रार दाखल केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, ३१ ऑक्टोबर रोजी स्वाती रसाळ या जागरण गोंधळाच्या कार्यक्रमास गेल्या होत्या. लहान मुले खेळावयास बाहेर गेली होती. वडगाव येथील माळीनगर, शिक्षक सोसायटीसमोर झोपडीत राहणाऱ्या दोन मुली व एक मुलगा अचानक बेपत्ता झाले. या मुलांचा सर्वत्र शोधाशोध केला. मात्र कुठेही सापडले नाहीत. स्वाती रसाळ यांनी वडगांव पोलिसांत धाव घेतली. रात्री ८ वाजता कु. प्रेम शरद हिवराळे (वय १३) कु. भाग्यश्री शरद हिवराळे (वय ११ ), प्रेरणा शरद हिवराळे (९) यांचे कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

पोलिस निरीक्षक कुमार कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार सुनील जावळे, हवालदार सचिन गायकवाड, सचिन देशमुख, संजय सुपे यांच्यासह पोलिस पथकाने युद्ध पातळी तपास सुरू केला आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक ऋतुजा मोहिते करीत आहेत.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीVadgaon Mavalवडगाव मावळ