महामार्गावर दरोडा टाकणाऱ्या तिघांना अटक
By Admin | Updated: October 15, 2016 05:56 IST2016-10-15T05:56:47+5:302016-10-15T05:56:47+5:30
नगर-कल्याण महामार्गावर बेल्हा गुळुंचवाडी येथे पाळीव जनावरे खरेदी करण्यासाठी कल्याण येथे ट्रकमधून जाणाऱ्या व्यापाऱ्यांना हत्याराचा धाक दाखवून जखमी

महामार्गावर दरोडा टाकणाऱ्या तिघांना अटक
आळेफाटा : नगर-कल्याण महामार्गावर बेल्हा गुळुंचवाडी येथे पाळीव जनावरे खरेदी करण्यासाठी कल्याण येथे ट्रकमधून जाणाऱ्या व्यापाऱ्यांना हत्याराचा धाक दाखवून जखमी करून रोकड लूटप्रकरणातील फरारी दोन आरोपींना आळेफाटा पोलिसांनी पुण्यातून अटक केली, अशी माहिती पोलीस निरीक्षक क्रांतिकुमार पाटील यांनी दिली.
नगर जिल्ह्यातील नेवासा येथून ट्रकमधून नगर-कल्याण महामार्गाने कल्याण येथे व्यापारी जात होते. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात बेल्हे जवळील गुळुंचवाडी येथे दुचाकीवरून आलेल्या सात जणांनी वाहने आडवी लावून अश्पाक शेख व शंकर ससे यांना धारदार शस्त्राचा धाक दाखवून मारहाण करत त्यांच्याकडून एक लाख वीस हजार रुपये रोख घेतले. दरोडेखोर पळत असताना व्यापाऱ्यांनी त्यातील ओंकार सुरेश शेजवळ (वय २१) यास पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.