शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Pune: पत्नीचे अपहरण करुन नेणाऱ्या पतीसह तिघांना अटक; केवळ ६ तासात घेतला शोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2022 21:15 IST

आज तुला जिवंत सोडणार नाही, आज तुझा शेवटचा दिवस आहे, असे धमकावून जबरदस्तीने केले होते अपहरण

पुणे : चारित्र्याचा संशय घेऊन वेगळे राहणार्या पत्नीचे अपहरण करुन तिला कारमधून घेऊन जाणाऱ्या पतीसह तिघांना चंदननगर पोलिसांनी फलटणजवळ ताब्यात घेतले. अमोल देवराव खोसे (वय २४, रा. रोहिना, ता. परतूर, जि. जालना), महादेव निवृत्त खानापूरे (वय २२, रा बामणी, ता. परतुर, जि. जालना) आणि ज्ञानेश्वर बबन पांजगे (वय २५, रा. परतुर, जि. जालना) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

याप्रकरणी खराडी येथे राहणार्या एका २६ वर्षाच्या महिलेने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना खराडी येथील मारवेल झपायर सोसायटीसमोर बुधवारी मध्यरात्री १२ वाजता घडली.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी महिला ही पतीपासून वेगळी राहत आहे. फिर्यादी या रात्री कामानिमित्त पायी जात होत्या. त्या खराडीतील मारवेल झपायर सोसायटीसमोर आल्या असताना कारमधून आरोपी आले. त्यांनी जबरदस्तीने फिर्यादीला कारमध्ये बसविले. यावेळी ररस्त्यावरुन जाणाऱ्या एकाकडे या महिलेने आपला मोबाईल टाकला. त्याला आपल्याला पळवून नेले जात असल्याचे ओरडून सांगितले. आरोपींनी तिचे हात पाय बांधून, आज तुला जिवंत सोडणार नाही, आज तुझा शेवटचा दिवस आहे, असे धमकावून जबरदस्तीने पळवून नेले. मोबाईल घेणाऱ्या नागरिकाने ही बाब तातडीने चंदननगर पोलिसांना सांगितली. अपहरण झाल्यानंतर केवळ ६ तासात घेतला शोध 

चंदननगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील जाधव, पोलीस निरीक्षक सुनील थोपटे, उपनिरीक्षक रामेश्वर रेवले व त्यांच्या सहकार्यांनी तातडीने या महिलेचा शोध सुरु केला. तेव्हा ही कार फलटणच्या दिशेने जात असल्याची त्यांना माहिती मिळाली. चंदननगर पोलिसांचे पथक तातडीने तिकडे रवाना झाले व त्यांनी कारचा शोध घेऊन या महिलेची सुटका केली व तिघांना ताब्यात घेतली. अपहरण झाल्यानंतर केवळ ६ तासात तिघांना पोलिसांनी अटक केली.

टॅग्स :Puneपुणेmarriageलग्नPoliceपोलिसKidnappingअपहरणArrestअटक