शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

Pune: पोलिसांना मारहाण करणाऱ्या तिघांना अटक; सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल

By विवेक भुसे | Updated: April 3, 2023 20:05 IST

बीट मार्शलने चौकशी केल्यावर त्याला मारहाण करणाऱ्या तिघांना कोंढवा पोलिसांनी अटक केली...

पुणे : मध्यरात्री कार घेऊन संशयास्पदरित्या थांबलेल्या तिघांकडे गस्तीवरील बीट मार्शलने चौकशी केल्यावर त्याला मारहाण करणाऱ्या तिघांना कोंढवा पोलिसांनी अटक केली आहे. मितेश संजय परदेशी (वय ३२, रा. जगतापनगर, वानवडी), मनिष जयप्रकाश मेहता (वय ३६, रा. मेहदसे हॉस्पिटल, दापोली, जि. रत्नागिरी), सुमित राजेश परदेशी (वय ३६, रा. शांतीनगर, वानवडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

याप्रकरणी पोलीस अंमलदार रोहित पाटील यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार मंहम्मदवाडी येथील रहेजा प्रिमियम सोसायटीसमोर रविवारी पहाटे १ वाजण्याच्या सुमारास घडला.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी हे उंड्री बीट मार्शल म्हणून कार्यरत आहेत. ते मध्यरात्री गस्त घालत असताना त्यांना रहेजा सोसायटीसमोर एक संशयास्पद कार थांबलेली आढळली. त्यांनी कारजवळ जाऊन आतील लोकांकडे विचारपूस केली. तेव्हा मनिष मेहता याने फिर्यादी यांना तू कोण आहेस आम्हाला विचारणारा, तुला माहित आहे का आम्ही कोण आहोत? असे बोलून फिर्यादी यांची कॉलर पकडून त्यांना धक्काबुक्की केली.

त्यांच्या शर्टाचे बटण तोडून फिर्यादी यांचे गालावर चापट मारुन इतरांनी आरेरावीची भाषा करुन शिवीगाळ करुन तुला इथेच संपवतो, अशी धमकी दिली. सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात येऊन तिघांना अटक करण्यात आली आहे़ तिघांना न्यायालयात हजर केले असता अधिक तपासासाठी एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस