शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

राज्य सरकारकडून पुणे विभागासाठी साडेतीनशे कोटींची नुकसानभरपाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2019 14:36 IST

महाआघाडी सरकार सत्तेत येऊन पंधरा दिवसांचा कालावधी लोटला, तरी शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत होते. 

ठळक मुद्देमहाआघाडी सरकारकडून आकस्मिकता निधीतून मदत :राष्ट्रपती राजवटीत दीडशे कोटींचे वाटप राज्यात मोठ्या प्रमाणात झालेल्या अवकाळी पावसाने माजवला हाहाकार

सुषमा नेहरकर-शिंदे - पुणे : सरकार स्थापन झाल्यानंतर देखील शासनाकडून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळत नसल्याची टीका सुरू झाल्यानंतर महाआघाडी शासनाने तातडीने आकस्मिकता निधीतून पुणे विभागासाठी ३२८ कोटी १० लाख रुपयांचा मदत निधी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना वितरित केला आहे. राज्यात आठ-दहा दिवसांसाठी आलेल्या राष्ट्रपती राजवटीत पुणे विभागात सुमारे दीडशे कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. आता अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना लवकरच मदतीचे वाटप होणार असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकृत सूत्रांनी सांगितले. सप्टेंबर- ऑक्टोबर महिन्यात संपूर्ण राज्यात मोठ्या प्रमाणात झालेल्या अवकाळी पावसाने हाहाकार माजवला. यामुळे हजारो हेक्टर क्षेत्रावरील शेतपिके पूर्णपणे उद्ध्वस्त झाली. हाताशी आलेले पीक पावसामुळे वाहून गेले. शेत पिकासोबतच जनावरे, शेततळी, शेतीचे बांध, घरांचेदेखील मोठ्या प्रमाणात  नुकसान झाले. राज्यात सत्तास्थापनेचे नाटक सुरू असताना शेतकरी मात्र या अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीमुळे होरपळून निघत होता. सत्ता स्थापनेसाठी सर्वच राजकीय पक्षांकडून शेतकऱ्यांच्या हितासाठी आम्ही सरकार स्थापन करत असल्याचा आव आणला जात होता; परंतु शेतकºयांना मात्र प्रत्यक्ष मदत मात्र मिळत नव्हती. राज्यात काही दिवसांसाठी राष्ट्रपती राजवट आल्यानंतर राज्यपालांनी पुणे विभागासाठी तातडीची मदत म्हणून सुमारे दीडशे कोटी रुपयांची मदत केली; परंतु त्यानंतर महाआघाडी सरकार सत्तेत येऊन पंधरा दिवसांचा कालावधी लोटला, तरी शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत होते. याबाबत महाआघाडी सरकारवर विरोधकांनी टीका केली. शेतकरीदेखील नवीन सरकारकडून मदत मिळेल याच्या प्रतीक्षेत होते. अखेर महाआघाडी सरकारने पुणे विभागासाठी मदतीचा दुसरा हप्ता दिला आहे. पुणे जिल्हाधिकाऱ्यांना सोमवारी मदतीचा हप्ता प्राप्त झाला असून, लवकरच शेतकºयांच्या बँक खात्यात मदत निधीचे वाटप करण्यात येणार असल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले, अशी माहिती उपजिल्हाधिकारी जयश्री कटारे यांनी दिली........वाटप केलेला निधी व नव्याने मंजूर निधीजिल्हा                             वाटप झालेला निधी (राष्ट्रपती राजवट)         महाआघाडी सरकारकडून आलेला निधी                                        पुणे                               ३९ कोटी ५५ लाख                                                        ८६ कोटी ४४ लाखसातारा                           १७ कोटी ५७ लाख                                                      ३८ कोटी ४० लाखसांगली                        ३४ कोटी ४८ लाख                                                         ७५ कोटी ३४ लाखसोलापूर                       ५८ कोटी १५ लाख                                                       १२७ कोटी ७ लाखकोल्हापूर                       ३८ लाख                                                                   ८४ लाखएकूण                       १५० कोटी १५ लाख                                                        ३२८ कोटी १० लाख

टॅग्स :PuneपुणेFarmerशेतकरीState Governmentराज्य सरकारRainपाऊस