शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
3
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
4
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
5
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
6
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
7
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
8
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
9
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
10
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
11
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
12
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
13
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
14
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
15
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
16
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
17
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
18
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
19
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
20
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

जमीन मालकाला गोळ्या घालण्याची धमकी; 20 लाखांची मागितली खंडणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2021 21:05 IST

सराफी व्यावसयिकासह चार जणांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या...

पुणे : मालकाने जमीन खरेदीखतामधील उर्वरित रक्कम मागितल्याचा राग मनात धरून गोळ्या घालण्याची धमकी देत 20 लाख रूपयांची खंडणी मागणाऱ्या बुधवार पेठेतील बड्या सराफी व्यावसायिकासह चार जणांना खंडणी विरोधी पथकाने अटक केली आहे. हा प्रकार मे 2016 ते एप्रिल 2021 दरम्यान घडला आहे.

याप्रकरणी सराफी व्यावसयिक गौतम जयंतीलाल सोळंकी आणि रणधीर जयंतीलाल सोळंकी यांच्यासह दिलीप साहेबराव यादव, सुमीत प्रकाश साप्ते आणि सागर दत्तात्रय मुजुमले यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, रणधीर सोळंकीसह तिघांना अटक करण्यात आली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे भोर तालुक्यातील ससेवाडीचे रहिवाशी आहेत. त्यांनी 2016 मध्ये वडिलोपार्जित जमीन विक्रीचा व्यवहार आरोपींबरोबर केला होता. त्यांनी आपली जमीन 93 लाख रूपयांना विकली होती. त्यापैकी 32 लाख 50 हजार रूपयांची रक्कम आरोपींनी त्यांना दिली होती. उर्वरित 60 लाख 25 हजार रूपयांची रक्कम फिर्यादी सोळंकी यांच्या दुकानात गेले असता त्यांनी चेक देण्यास नकार दिला.

त्यानंतर फिर्यादी हे मध्यस्थी असलेल्या दिलीप यादव यांच्या कार्यालयात गेले. मात्र यादव आणि साप्ते यांनी त्यांच्या कमरेला असलेले रिव्हॉल्व्हर त्यांच्या अंगावर रोखले आणि 20 लाख रूपये दिल्याशिवाय चेक देणार नाही. काय करायच ते कर. पुन्हा आला तर गोळ्या घालीन आणि पोलिसांमध्ये गेलास तर याद राख अशी धमकी त्यांनी फिर्यादी यांना दिली. त्यामुळे त्यांनी पोलिसांकडे तक्रार अर्ज दिला. या अर्जाची खातरजमा करून त्यांच्या ऑफिस व घरावर छापा टाकून चार जणांना अटक केली आहे. छाप्या दरम्यान शंभरहून अधिक मूळ खरेदीखत, साठेखत, विसारपावती, संमतीपत्र, करारनामे, एमओयू मिळाले आहेत.यात सही केलेले ब्लँक चेकबुक व चेक, सही केलेले मुद्रांक, दोन आलिशान गाड्या अणि दोन रिव्हॉल्व्हर जप्त करण्यात आले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास विरोधी पथकाचे खंडणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल पाटील करीत आहेत.--------------------------------

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटकjewelleryदागिने