शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

बारामती| भावाला जीवे मारण्याची धमकी देत मुलीला पळवून नेऊन केले लग्न; मुलासह तिघांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2022 19:14 IST

आळंदी येथे नेऊन तिच्या मर्जीविरुद्ध तिच्या सोबत आरोपीने विवाह केला....

बारामती: मुलीच्या भावाला जीवे मारण्याच्या धमकी देत स्वत: आत्महत्या करण्याची धमकी देत पळवून नेऊन तिच्या बरोबर विवाह केल्याचा धक्कादायक प्रकार बारामतीत उघड झाला आहे. या प्रकरणी शहर पोलिसांनी संबंधित मुलासह तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यापैकी दोघा जणांना अटक करण्यात आली आहे, एकजण फरारी आहे. पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीला तिच्या मर्जीविरुद्ध पळून नेऊन लग्न केल्याबाबत कलम ३६६, ३५४- ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलगी पुण्याला एसटी मधून जात असताना ती पुण्यामध्ये पोहोचली नाही. त्याबाबत पोलिसांत ३० जानेवारी रोजी मीसिंगची तक्रार दाखल होती. त्यानुसार पोलीसांनी तपास करून मुलीला पोलीस ठाण्यात आणल्यानंतर सबंधित मुलीने तक्रार दिली.

सहा महिन्यापासून ऋषिकेश अविनाश जगताप (रा. कोळी मळा, बारामती) याच्यासोबत ओळख होती. ओळखीनंतर ऋषिकेश तिचा सतत पाठलाग करत असे, ती त्याला विरोध करत होती .परंतु तो तिला लग्नाची मागणी घालत होता. मात्र, तिची त्याच्यासोबत लग्न करण्याची मानसिकता नव्हती. दरम्यान, मुलीच्या नातेवाईकांनी तिला पुण्याला जाण्यासाठी बारामती बसस्थानकावर सोडविल्याचे ऋषिकेशला समजले. त्याने ती युवती बसलेल्या एसटी बसचा पाठलाग केला. शहरातील कसबा या ठिकाणी बस थांबवत तिला खाली उतरण्यास सांगितले. परंतु त्या मुलीने त्याचे ऐकले नाही. त्यानंतर मुलाने त्या मुलीस मोबाईलवर ती जर एसटीमधून उतरुन त्याच्यासोबत आली नाही, तर तिच्या भावाला मारून टाकू आणि स्वत:ही आत्महत्या करेल, अशी धमकी दिली. त्यामुळे सदर मुलगी भयभीत होऊन शिवरी येथे एसटीतून खाली उतरली.

यावेळी आळंदी येथे नेऊन तिच्या मर्जीविरुद्ध तिच्या सोबत आरोपीने विवाह केला. विवाहाला शुभम कराळे व किरण खोमणे (रा. बारामती) हे साक्षीदार म्हणून उपस्थित होते. त्यानंतर मुलगी पोलीस ठाण्यात आल्यानंतर तिने सर्व आरोपींविरुध्द तिचा विनयभंग केला. तिच्या मर्जीविरुद्ध विवाह आळंदी या ठिकाणी केल्याची फिर्याद दिली. त्यानुसार पोलीसांनी ऋषिकेश व शुभम या दोघांना अटक केली,तर किरण खोमणे फरारी असल्याचे पोलीस निरीक्षक सुनील महाडीक यांनी सांगितले.अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक युवराज घोडके करीत आहेत. 

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारी