पाण्यावरुन कोयत्याने वार करुन जीवे मारण्याची धमकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 04:10 IST2020-12-06T04:10:18+5:302020-12-06T04:10:18+5:30

पुणे : पुढचे महायुद्ध पाण्यावरुन होणार असे म्हटले जाते. हे महायुद्ध होईल तेव्हा होईल, पण पुण्यात आतापासूनच पाण्यावरुन हाणामारी ...

Threatened to kill with a scythe from the water | पाण्यावरुन कोयत्याने वार करुन जीवे मारण्याची धमकी

पाण्यावरुन कोयत्याने वार करुन जीवे मारण्याची धमकी

पुणे : पुढचे महायुद्ध पाण्यावरुन होणार असे म्हटले जाते. हे महायुद्ध होईल तेव्हा होईल, पण पुण्यात आतापासूनच पाण्यावरुन हाणामारी होऊ लागल्या आहेत. ही भांडणे सोडविण्यासाठी गेलेल्या तरुणावर चौघांनी काेयत्याने वार करुन जबर जखमी केले.

दीपिका सावंत, दिशा सावंत, दर्शना सावंत आणि दिनेश सावंत (सर्व रा. मोहम्मदवाडी, कोंढवा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

याप्रकरणी हेमंत जगदीश सावंत (वय ३३, रा. मोहम्मदवाडी, कोंढवा) यांनी कोंढवा पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी हे एकमेकांचे नातेवाईक असून शेजारी शेजारी राहतात. हेमंत सावंत यांची आई शुक्रवारी पहाटे ५ वाजता घराबाहेरच्या पाण्याच्या नळावर पाणी भरत होत्या. त्यामुळे त्यांचे चुलते दिनेश सावंत यांच्या घरात वेगाने पाणी जात नसल्याने त्यांनी हेमंत यांच्या आईला शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. ते पाहून हेमंत भांडणे सोडविण्यासाठी गेले. तेव्हा दिनेश सावंत याने हेमंत याच्या डावे कानावर कोयत्याने मारुन जखमी केले. तसेच हेमंत यांच्या वडिलांना जीवे मारण्याची धमकी दिली.

Web Title: Threatened to kill with a scythe from the water