शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
3
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
4
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
5
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
6
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
7
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
8
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
9
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
10
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
11
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
12
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
13
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
14
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
16
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
17
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
18
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
19
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
20
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख

Vasant More: 'सावध राहा रुपेश!', मनसे नेते वसंत मोरेंच्या मुलाला धमकी; फेसबुक पोस्ट चर्चेत, पोलिसांकडून दखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2022 06:43 IST

पुण्याचे मनसेचे डॅशिंग नेते वसंत मोरे (Vasant More) नेहमीच चर्चेत असतात. वेगवेगळ्या आंदोलनांमुळे वसंत मोरे यांनी प्रशासनाला लक्ष वेधून घेण्यास भाग पाडलं आहे.

पुणे-

पुण्याचे मनसेचे डॅशिंग नेते वसंत मोरे (Vasant More) नेहमीच चर्चेत असतात. वेगवेगळ्या आंदोलनांमुळे वसंत मोरे यांनी प्रशासनाला लक्ष वेधून घेण्यास भाग पाडलं आहे. तसंच विविध उपक्रमांमुळेही वसंत मोरेंचं नाव नेहमीच आघाडीवर असतं. आता वसंत मोरे यांच्या मुलाला धमकीचं पत्र आल्यानं खळबळ उडाली आहे. सावध राहा रुपेश! अशा आशयाची एक चिठ्ठी रुपेश मोरे यांच्या कारवर ठेवण्यात आली होती. याप्रकरणी रुपेश मोरे यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात रितसर तक्रारीची नोंद केली आहे. पोलिसांकडून या प्रकरणाच्या तपासाला सुरुवात झाली आहे. 

...ही काळजी अन् आपुलकी केवळ ST वाल्यांकडेच, वेळ रात्री ११.४५... पुण्यातली बस अन् 'ती' ताई

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मशिदीवरील भोंग्यांच्या विरोधाच्या भूमिकेवर वसंत मोरे यांनी फारकत घेतली होती. त्यामुळेही वसंत मोरेंचं नाव खूप चर्चेचा विषय ठरलं. पक्ष नाराजीचाही मोठा फटका वसंत मोरे यांना बसला आणि पुणे शहराध्यक्ष पद वसंत मोरे यांना गमवावं लागलं. शहराध्यक्ष पदावरुन हकालपट्टी झाल्यानंतरही राज ठाकरे यांनी स्वत: समजून काढल्यामुळे वसंत मोरे अजूनही मनसेचे कार्यकर्ते आणि नगरसेवक म्हणून काम करत आहेत. पण पुणे मनसे पदाधिकाऱ्यांमध्ये सारंकाही आलबेल नसल्याचं चित्र वारंवार दिसून आलं आहे. पुणे मनसेच्या नेत्यांकडून डावललं जात असल्याचा आरोप वसंत मोरे करत आले आहेत. त्यात आता वसंत मोरे यांच्या मुलाला आलेल्या धमकीच्या चिठ्ठीनं सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. आपल्या मुलाला आलेल्या धमकीच्या पत्राबाबतची एक पोस्ट वसंत मोरे यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर शेअर केली आहे. 

काय आहे वसंत मोरे यांची फेसबुक पोस्ट?"मुलगा म्हंटले की प्रत्येक बापाचा अभिमान असतो आणि बाप म्हंटले की प्रत्येक पोराचा आयडॉल असतो...आमचेही अगदी तसंच आहे, पण कोणाला तरी हे का खटकतंय तेच समजत नाही... राजकारणात काम करत असताना अनेकदा कळत नकळत कधी कोण शत्रू होतो तेच समजत नाही...गेले दोन तीन दिवस झालं बोलू की नको तेच समजत नव्हते, पण आज ठरवले तुमच्या सोबत बोललच पाहिजे...साहेबांच्या वाढदिवसानिमित्त झालेल्या रोजगार मेळाव्याची रुपेश आणि त्याच्या मित्र परिवाराने सर्व तयारी केली, त्याची गाडी त्याने शाळेच्या मैदानात लावली होती त्या दरम्यान कोणी तरी त्याच्या गाडीच्या वायफर मध्ये "सावध रहा रुपेश" आशी चिट्ठी लावून ठेवली जी रात्री घरी आल्यावर पाहिली...तसा तो कोणाच्या आध्यात मध्यात नसतो तरीही असे का ? हाच प्रश्न मनाला चटका लावून जातोय...आपण रात्रंदिवस जनतेचा विचार करायचा त्यांची कामं करायची आणि कोणी तरी आपल्या कुटुंबा बाबतीत असा विचार करायचा ?हे का तेच कळत नाही...भारती विद्यापीठ पोलीस बाकी तपास करत आहेत...तू जो कोणी असशील तो पुसट असा कॅमेऱ्यात दिसतोय...बाबा फक्त इतकेच लक्षात ठेव त्याचा बाप वसंत ( तात्या ) मोरे आहे...!"

असं वसंत मोरे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. यासोबत वसंत मोरे यांनी धमकी देण्यात आलेल्या चिठ्ठीचाही फोटो यासोबत पोस्ट केला आहे.    

 

टॅग्स :MNSमनसेPuneपुणेRaj Thackerayराज ठाकरे