कौमार्य शस्त्रक्रियेसाठी ‘त्या’ मोजताहेत हजारो रूपये; पुणे-मुंबईत प्रमाण वाढले

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2019 01:12 AM2019-05-15T01:12:35+5:302019-05-15T01:13:08+5:30

एकीकडे कौमार्य चाचणीविरोधात कंजारभाट समाजातील तरूणी आवाज उठवत असताना दुसरीकडे मात्र समाजाच्या विविध वर्गातील तरूणींकडूनच ‘कौमार्य’ पुन:प्राप्तीसाठी हजारो रूपये मोजले जात आहेत.

 Thousands worth counting for 'virgin surgery'; There was an increase in Pune-Mumbai | कौमार्य शस्त्रक्रियेसाठी ‘त्या’ मोजताहेत हजारो रूपये; पुणे-मुंबईत प्रमाण वाढले

कौमार्य शस्त्रक्रियेसाठी ‘त्या’ मोजताहेत हजारो रूपये; पुणे-मुंबईत प्रमाण वाढले

googlenewsNext

पुणे : एकीकडे कौमार्य चाचणीविरोधात कंजारभाट समाजातील तरूणी आवाज उठवत असताना दुसरीकडे मात्र समाजाच्या विविध वर्गातील तरूणींकडूनच ‘कौमार्य’ पुन:प्राप्तीसाठी हजारो रूपये मोजले जात आहेत. पुणे-मुंबईमध्ये वर्षाला २० ते ३० तरूणी कौमार्य शस्त्रक्रिया करून घेत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
सायकलिंग, व्यायाम आदींमळे पटलाचा पापुद्रा फाटू शकतो. वैद्यकीय तज्ज्ञांनी हे सत्य अनेकदा जाहीरपणे सांगितले आहे. महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठानेही ‘कौमार्य चाचणी’ अवैज्ञानिक मानत हा विषय अभ्यासक्रमातून वगळला आहे. तरीही महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात ‘कौमार्य’विषयीचा दृष्टीकोन बदललेला नाही. कंजारभाट समाजात तरूणींच्या केल्या जाणाऱ्या कौमार्य चाचणीवरून अनेक वादंग उठले. मात्र तरीही मानसिकता बदललेली नाही हे तरूणींकडून कौमार्य पुन:प्राप्तीसाठी केल्या जाणाºया शस्त्रक्रियेवरून अधोरेखित झाले आहे.
यासंदर्भात ‘लोकमत’ने कॉस्मॅटिक व प्लास्टिक सर्जन डॉ. पराग सहस्रबुद्धे यांच्याशी संवाद साधला असता तरूणींचा कौमार्य शस्त्रक्रियेकडे कल वाढला असल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले, खरेतर पटलाचा पापुद्रा फाटण्यास अनेक कारणे आहेत. मात्र आजही कौमार्याबददलच्या मानसिकतेत फरक पडलेला नाही. कुणाशीतरी शरीरसंबंध आले आहेत. पण आता माझे दुसºया तरूणाबरोबर लग्न होणार आहे त्यामुळे कौमार्य मला परत हवे आहे, असेही आमच्याकडे येणाºया काही मुलींकडून सांगितले जाते. ते पुन्हा मिळवून देणे शक्य नसले तरी त्या पापुद्राचा काही भाग शिल्लक राहिलेला असतो, तो शस्त्रक्रियेच्या माध्यमातून जोडला जाऊ शकतो.
ही शस्त्रक्रिया लग्नाच्या ८ ते १० दिवस आधी केली जाते. कारण जे पापुद्रे जोडलेले असतात ते फार काळ टिकत नाहीत. पण तरीही शरीरसंबंधानंतर पापुद्रा फाटला तरी रक्तस्त्राव होईलच हे सांगता येत नाही. मात्र बुरसटलेल्यांकडून आजही कौमार्याचा पुरावा मागितला जात असल्याने तरूणी दबावाखाली येऊन कौमार्य सिद्ध करण्यासाठी धडपड करत आहेत. कौमार्य पुन:प्राप्तीसाठी तरूणी हजारो रूपये मोजायला तयार असल्याचे सहस्रबुद्धे यांनी सांगितले.

Web Title:  Thousands worth counting for 'virgin surgery'; There was an increase in Pune-Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे