शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

हजारो आदिवासी विद्यार्थी आरोग्यसेवेपासून वंचित; १३०० पेक्षा अधिक मुलांचे मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2020 20:23 IST

आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांचे सर्पदंश, आजारपण, अपघात, पाण्यात बुडून, आकस्मिक व इतर अन्य कारणाने जवळपास १३०० पेक्षा अधिक मुलांचे मृत्यू

ठळक मुद्देआश्रमशाळा आरोग्य तपासणी पथक निष्क्रिय मागील आठ महिन्यांपासून बंद असलेले आश्रमशाळा आरोग्य तपासणी पथक कार्यान्वित

पुणे : घोडेगाव तालुक्यातील (आंबेगाव जि.)ग्रामीण रुग्णालयाच्या अखत्यारित असलेले आश्रमशाळा आरोग्य तपासणी  पथक अवघ्या एका दिवसाचा फिरती अहवाल मागील आठ महिने सादर करीत आहे.आदिवासी विद्यार्थींसाठी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कार्यान्वित करण्यात आलेली पथके आदिवासी आश्रमशाळांची तपासणी करण्याचे काम करीत नसल्याचा आरोप आदिवासी सेवक पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते रवींद्र उमाकांत तळपे यांनी केला आहे.घोडेगाव कार्यक्षेत्रात १० शासकीय आश्रमशाळा,३ अनुदानित आश्रमशाळा व १४ शासकीय वसतीगृहे अशा एकून २७ आश्रमशाळांचा समावेश आहे.तसेच शासकीय आश्रमशाळेत ३३०७, अनुदानित आश्रमशाळेत ११३६ व शासकीय वसतीगृहात ८१० असे एकूण ५२५३ विद्यार्थी आहेत.तसेच पथकाने २३ दिवस फिरती करणे आवश्यक आहे. मात्र तपासणीचे काम योग्य पद्धतीने केले जात नाही.मागील आठ महिन्यांपासून बंद असलेले आश्रमशाळा आरोग्य तपासणी पथक कार्यान्वित करुन पुणे जिल्हातील आश्रमशाळा व वसतीगृहातील हजारो विद्यार्थ्यांना तात्काळ आरोग्य सुविधा उपलब्ध करुन द्या अशी मागणी त्यांनी केली आहे. आदिवासी विकास मंत्री अँड.के सी पाडवी यांना दिलेल्या पत्रात ही मागणी करण्यात आली आहे.आदिवासी विकास विभागाच्या शासकीय व अनुदानित आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांचे सर्पदंश, आजारपण, अपघात, पाण्यात बुडून, आकस्मिक व इतर अन्य कारणाने जवळपास १३०० पेक्षा अधिक मुलांचे मृत्यू झालेले आहेत. असे दुर्देवी प्रकार टाळण्यासाठी उपाययोजना कराव्यात तसेच आश्रमशाळा सुधारण्यासाठी कठोर नियम बनवावेत अशी मागणी करणारी याचिका मी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली. त्यामुळे आदिवासी विकास विभागातील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणीसाठी ३७ नियमित पथकांची एकूण मंजूर पदसंख्या १४८ करुन या पदांना शासनाने कायमस्वरुपी मान्यता दिली आहे. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान कार्यक्रमाअंतर्गत ३७ आश्रमशाळा पथकामार्फत आश्रमशाळा विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात येते, असे रवींद्र उमाकांत तळपे यांनी सांगितले.आश्रमशाळा आरोग्य तपासणी पथकाचे वैद्यकीय अधिकारी, गट अ मंजूर असूनही २४.७.२०१९ पासून हे पद रिक्त आहे.सदर वैद्यकीय अधिकारी यांनी राजीनामा दिल्याने हे पद भरण्यात आलेले नाही किंवा या पदाचा पदभार कोणाकडेही देण्यात आलेला नाही. सहा. परिचारिका, औषध निर्माता व वाहने चालक ही पदे भरलेली असूनही तपासणी करण्यासाठी वैद्यकीय अधिकारीच उपलब्ध नसल्याचे मागील सहा महिन्यांपासून शासकीय आश्रमशाळा, अनुदानित आश्रमशाळा व शासकीय वसतीगृहातील हजारो विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आलेली नाही. तसेच पथकाला २१ वषापूर्वीचे वाहन देण्यात आले असून, ते वारंवार दुरुस्ती करावे लागत आहे. याबाबतचा प्रस्ताव परिवहन उपसंचालक, पुणे यांना पाठविण्यात आलेला आहे. मात्र त्यावर कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही.  ज्यामुळे हजारो आदिवासी विद्यार्थी आरोग्य सुविधेपासून वंचित असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेSchoolशाळाDeathमृत्यू