शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
3
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
4
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
5
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
6
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
7
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
8
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
9
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
10
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
11
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
12
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
13
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
14
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
15
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
16
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
17
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
18
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
19
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
20
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा

पुण्यात हजारो विद्यार्थ्यांनी केलं सामुहिक अथर्वशीर्ष पठण

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2017 1:35 PM

शुक्रवारी सकाळी नवरात्रोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाची माळ विध्यार्थ्यांच्या सामूहिक अथर्वशीर्ष पठणाने गुंफली . 

ठळक मुद्दे शुक्रवारी सकाळी नवरात्रोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाची माळ विध्यार्थ्यांच्या सामूहिक अथर्वशीर्ष पठणाने गुंफली .  हजारो विद्यार्थ्यांच्या मुखातून श्री सुक्त व अथर्वशीर्ष पठणाचा स्वर शुक्रवारी सकाळी निनादला

पुणे : आकाशात घुमणारा शंखनाद अन् ढोल ताशाच्या गजरात हजारो विद्यार्थ्यांच्या मुखातून श्री सुक्त व अथर्वशीर्ष पठणाचा स्वर शुक्रवारी सकाळी निनादला. श्री महालक्ष्मी मंदिर, सारसबाग नवरात्रोत्सवतर्फे शुक्रवारी सकाळी नवरात्रोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाची माळ विध्यार्थ्यांच्या सामूहिक अथर्वशीर्ष पठणाने गुंफली . 

गणेश कला क्रिडा रंगमंचाच्या सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शहरांतील विविध शाळांतील विद्यार्थी उत्स्फुर्तपणे सहभागी झाल्याने मंगलमय वातावरणात हा कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी महापौर मुक्ता टिळक, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे, अभिनेता पुष्कर श्रोत्री, भाग्यश्री संकपाळ, गायिका मुग्धा वैशंपायन, प्राजक्ता गायकवाड, महालक्ष्मी मंदीरचे मुख्य संस्थापक विश्वस्त राजकुमार अगरवाल, मुख्य विश्वस्त अमिता अगरवाल, विश्वस्त प्रताप परदेशी, भारत अगरवाल, तृप्ती अगरवाल, उद्योजक कृष्णकुमार गोयल, राजमाला गोयल, बांधकाम व्यावसायिक राजेश सांकला आदी उपस्थित होते.

सभागृहामध्ये पहाटे साडे पाच वाजल्यापासून विद्यार्थ्यांची गर्दी झाली होती. विध्यर्थ्यांच्या गर्दीने सभागृह फुलून गेले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस स्वरूपवर्धिनीच्या ढोल-ताशा पथकाने आपल्या वादनाने सभागृह दणाणून सोडले. त्यापाठोपाठ मधुकर सिधये आणि त्यांच्या सहकाºयांनी शंखनाद केला. शंखांनादाच्या ध्वनीत सादर केलेल्या प्रार्थनेस उत्स्फूर्त दाद मिळाली. त्यानंतर गणेश स्तवन, ओंकार वंदनेने भक्तमय वातावरण निर्माण केले. त्यापाठोपाठ विद्यार्थ्यांनी गायत्री मंत्राचे पठण, अथर्वशीर्ष पठण, श्री सूक्त पठण केले. यानंतर गणरायाच्या आरतीने या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.