शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

'' कौमार्य''  शस्त्रक्रियेसाठी तरूणी मोजतायेत हजारो रूपये........

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2019 06:00 IST

‘कंजारभाट’ समाजात तरूणींच्या केल्या जाणा-या कौमार्य चाचणीवरून अनेक वादंग उठले.

ठळक मुद्देतरूणींचा कौमार्य शस्त्रक्रियेकडे कल वाढला, पुण्या-मुंबईत वाढले प्रमाण

पुणे :  एकीकडे कौमार्य चाचणीवरून ‘कंजारभाट’ समाजातील तरूणी आवाज उठवत असताना दुसरीकडे मात्र विविध वर्गातील तरूणींकडूनच ‘कौमार्य’ पुन:प्राप्तीसाठी हजारो रूपये मोजले जात आहेत. पुण्या-मुंबईमध्ये वर्षाला जवळपास 20 ते 30 तरूणी कौमार्य शस्त्रक्रिया करून घेत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. खरतर स्त्रीचं ’योनीपटल’ हा अत्यंत नाजूक भाग असतो. लग्नानंतर केवळ शारीरिक संबंधांनंतरच नव्हे तर आजच्या धकाधकीच्या जीवनात सायकलिंग, खेळ किंवा व्यायामाने देखील आतला पापुद्रा फाटू शकतो हे सत्य वैद्यकीय तज्ञांनी अनेकदा जाहीरपणे सांगितले आहे. महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठानेही ‘कौमार्य चाचणी’ अवैज्ञानिक मानत हा विषय अभ्यासक्रमातून वगळला आहे.  तरीही महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात  ‘कौमार्य’ विषयीचा दृष्टीकोनला बदलू शकलेला नाही, हे दुर्देव म्हणावे लागेल. ‘कंजारभाट’ समाजात तरूणींच्या केल्या जाणा-या कौमार्य चाचणीवरून अनेक वादंग उठले. मात्र तरीही मानसिकता बदललेली नाही हे तरूणींकडून कौमार्य पुन:प्राप्तीसाठी केल्या जाणा-या शस्त्रक्रियेवरून अधोरेखित झाले आहे. यासंदर्भात ‘लोकमत’ प्रतिनिधीने प्रसिद्ध कॉस्मँटिक व प्लँस्टिक सर्जन डॉ. पराग सहस्त्रबुद्धधे यांच्याशी संवाद साधला असता तरूणींचा कौमार्य शस्त्रक्रियेकडे कल वाढला असल्याचे त्यांनी सांगितले.     ते म्हणाले, योनीपटलावर एक पापुद्रा असतो. पण प्रत्येक मुलीला तो जन्मजात असतोच असं नाही. मात्र आपल्याकडे असा एक समज आहे की लग्नानंतर शरीरसंबंधावेळी हा पापुद्रा फाटला तर त्या तरूणीचे कौमार्य सहीसलामत आहे. खरेतर हेच केवळ पापुद्रा फाटण्याचे एकमेव कारण असू शकत नाही. त्याला अनेक कारणं आहेत. मात्र आजही कौमार्याबददलच्या मानसिकतेत फरक पडलेला नाही. तरूणी जेव्हा आमच्याकडे येतात. तेव्हा त्यांचे कुणाशीतरी शरीरसंबंध आले आहेत. पण आता माझे दुस-या तरूणाबरोबर लग्न होणार आहे त्यामुळे कौमार्य मला परत हवं आहे असे मुलींकडून सांगितले जाते. ते पुन्हा मिळवून देणे शक्य नसले तरी त्या पापुद्राचा काही भाग शिल्लक राहिलेला असतो. तो शस्त्रक्रियेच्या माध्यमातून जोडला जाऊ शकतो. ही शस्त्रक्रिया लग्नाच्या आठ ते दहा दिवस आधी केली जाते. कारण जे पापुद्रे जोडलेले असतात ते फारकाळ टिकत नाहीत. पण तरीही शरीरसंबंधानंतर पापुद्रा फाटला तरी रक्तस्त्राव होईलच हे सांगता येत नाही. मात्र काही बुरसटलेल्या समाजाच्या डोक्यातून आजही कौमार्याचा पुरावा मागितला जात असल्याने तरूणी दबावाखाली येऊन कौमार्य सिद्ध करण्यासाठी धडपड करत आहेत. कौमार्य पुन:प्राप्तीसाठी विविध वर्गातील तरूणी हजारो रूपये मोजायला तयार असल्याचे त्यांनी सांगितले.----------------------------------------------------------

टॅग्स :PuneपुणेHealthआरोग्यWomenमहिलाSex Lifeलैंगिक जीवनdoctorडॉक्टर