शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

गणेशोत्सवात पळविले हजारांवर मोबाईल, १६ चोरट्यांकडून शंभराहून अधिक हॅँडसेट हस्तगत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2018 02:15 IST

गणेश विसर्जन मिरवणुकीत गर्दीचा फायदा घेऊन मोबाईल चोरीच्या एक हजारांहून अधिक घटना घडल्या असून, गुन्हे शाखेच्या युनिट दोनने मोबाईल चोरीसाठी खास मालेगावहून दोन गाड्या करून आलेल्या टोळीतील ९ जणांना ताब्यात घेतले आहे़

पुणे  - गणेश विसर्जन मिरवणुकीत गर्दीचा फायदा घेऊन मोबाईल चोरीच्या एक हजारांहून अधिक घटना घडल्या असून, गुन्हे शाखेच्या युनिट दोनने मोबाईल चोरीसाठी खास मालेगावहून दोन गाड्या करून आलेल्या टोळीतील ९ जणांना ताब्यात घेतले आहे़ त्यांच्याकडून आतापर्यंत ७५ हँडसेट हस्तगत केले आहे़ डेक्कन पोलिसांनी तिघांना अटक करुन त्यांच्याकडून २७ मोबाईल जप्त केले आहेत़ याशिवाय विश्रामबाग, फरासखाना पोलिसांनी प्रत्येकी दोघांना ताब्यात घेतले आहे़विसर्जन मिरवणुकीत लक्ष्मी रोड, टिळक रोड, कुमठेकर रोड, केळकर रोड या चार प्रमुख मार्गांवर मोबाईल चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी विशेष पथके ठेवली होती़ तसेच, साध्या वेशातील पोलिसांची गस्तही सुरु होती़असे असताना चोरट्यांच्या टोळ्यांनी मोठ्या प्रमाणावर मोबाईल लंपास केले़ या चोऱ्या प्रामुख्याने लक्ष्मी रोडवर बेलबाग चौक ते विजय टॉकीज चौक दरम्यान घडल्या़ तसेच, बेलबाग चौक ते मंडई दरम्यानही मोबाईल, पाकीट लांबविण्याच्या घटना अधिक होत्या़गुन्हे शाखेच्या युनिट २ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार व त्यांच्या सहकाºयांनी दगडूशेठ गणपती व हुजूरपागा येथे मालेगावहून आलेल्या चोरट्यांना पकडले़ हे पथक गस्त घालत असताना त्यांनी दोघा जणांना मोबाईल चोरताना पकडले़ त्यांच्याकडे केलेल्या चौकशीतून वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या त्यांच्या साथीदारांना ताब्यात घेण्यात आले़ आतापर्यंत एकूण ९ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून ७५ मोबाईल हस्तगत करण्यात आले आहे़ त्यांच्या आणखी साथीदारांना पकडण्यासाठी एक पथक रवाना झाले आहे़ डेक्कन पोलिसांनी मोबाईल चोरणाºया तिघांना अटक करुन त्यांच्याकडून २७ मोबाईल जप्त केले आहेत़ सुरज सुभाष कोल (वय २३, रा़ शहाजपूर, मध्य प्रदेश), चपाटी शाम दीपक (वय १९, रा़ बबीना, झाशी, उत्तर प्रदेश) आणि अरुण प्रकाश कोल (वय २१, रा़ शहाजपूर, मध्य प्रदेश) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत़ डेक्कन पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक एस़ के़ सोनावणे व त्यांच्या सहकाºयांना झेड ब्रिजजवळ मोबाईल चोरटे थांबले असल्याची माहिती मिळाली़ त्यावरुन त्यांनी तिघांना ताब्यात घेतले़ त्यांच्याकडून २७ मोबाईल जप्त केले आहेत़ याशिवाय फरासखाना व विश्रामबाग पोलिसांनी दोन दोन चोरट्यांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडे तपास करण्यात येत आहे़अल्पवयीन मुलांचा वापरविसर्जन मिरवणुकीत अल्पवयीन मुलांचा मोबाईल चोरीसाठी वापर करण्यात आल्याचे दिसून आले़ मुख्य मिरवणूक मार्गावर मोठ्या प्रमाणावर मोबाईल चोरीला गेले़ सायंकाळनंतर भाऊ रंगारी, अखिल मंडई मंडळ, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाले़ त्यांचे दर्शन घेण्यासाठी लक्ष्मी रोडवर मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती़ त्याचा गैरफायदा घेऊन घोळक्याने चोरटे मोबाईल, पाकिटे चोरत असल्याचे आढळून आले़हे गणपती पुढे गेल्यानंतर, विश्रामबाग, फरासखाना पोलीस ठाणे व मंडई पोलीस चौकी येथे मोबाईल चोरीला गेल्याच्या तक्रारी देण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती़ पोलिसांनी त्यांना शहर पोलीस दलाच्या वेबसाईटवर लॉस्ट अँड फाऊंड या ठिकाणी तक्रार देण्यास सांगितले़ त्यामुळे विसर्जन मिरवणुकीत आतापर्यंत किती मोबाईल चोरीला गेले याची अजून नोंद पूर्ण झाली नाही़ हजाराहून अधिक मोबाईल चोरीला गेल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली़

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPuneपुणे