पाईपलाईन फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:09 IST2021-04-25T04:09:19+5:302021-04-25T04:09:19+5:30
सध्या उन्हाळ्याचे दिवस आल्याने पाणीटंचाई असताना पाणीपुरवठा विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने दररोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे. ...

पाईपलाईन फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया
सध्या उन्हाळ्याचे दिवस आल्याने पाणीटंचाई असताना पाणीपुरवठा विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने दररोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे.
पाईपलाईन दुरुस्त करून पाण्याचा होणार अपव्यय थांबवावा, अशी मागणी मनसेचे शहर उपाध्यक्ष सुहास निम्हण यांनी केले आहे.
जर येत्या ८ दिवसांत पाईपलाईनची दुरुस्ती झाली नाही तर मनसे स्टाईल आंदोलन केले जाईल, असा इशारा मनसेच्यावतीने देण्यात आला आहे.
या वेळी मनसेच्या वतीने महापालिका सहाय्यक आयुक्त औंध बाणेर क्षेत्रीय कार्यालय यांना निवेदन देण्यात आले. या वेळी मनसेचे पुणे शहर उपाध्यक्ष सुहास निम्हण, प्रभागाध्यक्ष नीलेश जुनवणे, शाखाध्यक्ष अनिल व्हटकर, अशोक दळवी, सिद्धेश सातव, आनंद शिंदे, रोहन जाधव, महेंद्र सोनवणे हे उपस्थित होते.