वृक्षप्रेमींच्या सजगतेमुळे वाचले साडेचार हजार वृक्ष

By Admin | Updated: May 22, 2014 05:57 IST2014-05-22T05:57:26+5:302014-05-22T05:57:26+5:30

बांधकाम व्यावसायिक तसेच महापालिकेच्या विकासकामांसाठी शहरातील तब्बल साडेचार हजार वृक्षांचा बळी देण्याचा उद्यान विभागाचा डाव शहरातील वृक्षप्रेमींनी हाणून पाडला

Thousand thousand trees are read by the awareness of trees | वृक्षप्रेमींच्या सजगतेमुळे वाचले साडेचार हजार वृक्ष

वृक्षप्रेमींच्या सजगतेमुळे वाचले साडेचार हजार वृक्ष

पुणे : बांधकाम व्यावसायिक तसेच महापालिकेच्या विकासकामांसाठी शहरातील तब्बल साडेचार हजार वृक्षांचा बळी देण्याचा उद्यान विभागाचा डाव शहरातील वृक्षप्रेमींनी हाणून पाडला. हे वृक्ष तोडण्याचा प्रस्ताव आज झालेल्या वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत मांडण्यात आला होता. मात्र, या वृक्षतोडीवर आक्षेप घेतल्यानंतर सुनावणीसाठी बोलविण्यात आलेल्या वृक्षप्रेमींनी प्राधिकरणाच्या रचनेवरच आक्षेप घेत उद्यान विभाग आणि महापालिकेचा अनागोंदी कारभार उघड्यावर आणल्याने पदवीधर मतदारसंघाच्या आचारसंहितेचे कारण सांगत महापालिका आयुक्त विकास देशमुख यांना प्राधिकरणाची बैठक गुंडाळावी लागली. शहरातील बांधकामे, धोकादायक वृक्ष, खासगी जागा तसेच महापालिकेच्या विकासकामांसाठी वृक्ष तोडण्याची २३९ प्रकरणे वृक्ष प्राधिकरणाकडे आली आहेत. या सर्व प्रकरणात सुमारे साडेचार हजार वृक्ष तोडण्याची परवानगी मागण्यात आली आहे. यावर केवळ चार व्यक्तींनी आक्षेप घेतला होता. त्यांना या प्रकरणी सुनावणीसाठी आज बोलविण्यात आले होते. (प्रतिनिधी)

Web Title: Thousand thousand trees are read by the awareness of trees