शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

जे जमिनीवर राहणार नाहीत, त्यांनी आरक्षण घेऊ नये; मनोज जरांगेंचं नारायण राणेंना एका वाक्यात उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2023 12:01 IST

आज मनोज जरांगे पाटील पुणे जिल्ह्यात सभा घेणार आहेत.

पुणे-मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या काही दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. अंतरवली सराटी येथील मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे पु्न्हा एकदा मराठा आरक्षणाची चर्चा सुरू आहे.  मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर ४० दिवसांचा अवधी दिला आहे, काही दिवसापूर्वी अंतरवली सराटी या गावात आरक्षणा संदर्भात मोठी सभाही झाली. या सभेत सरकारने लवकरात लवकर आरक्षण जाहीर करावे अशी, मागणी जरांगे यांनी केली. दरम्यान, काल केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी 'मराठा समाज वेगळा, कुणबी समाज वेगळा. मनोज जरांगे पाटील यांनी जरा अभ्यास करावा. मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र नको आहे, असे मत व्यक्त केलं. यावरुन आता आरोप -प्रत्यारोप सुरू आहेत. 

मराठा कुणबी वेगवेगळे, मला ते प्रमाणपत्र नको, जरांगेंनी अभ्यास करावा; नारायण राणेंचा विरोध

मनोज जरांगे पाटील यांनी आज नारायण राणे यांच्या विधानाला प्रत्युत्तर दिले आहे. मनोज जरांगे पाटील म्हणाले, राज्यातील कानाकोपऱ्यातील मराठा समाज आरक्षण मागत आहेत. कुणबी घेण्याला काही वाईट नाही, कुणबी म्हणजे शेती, आमचा बाप शेती करतो मग तो श्रीमंत मराठा असला तरीही शेती करतो. जे जमिनीवर राहणार नाहीत,  मायभूमीत राहणार नाहीत त्यांनी आरक्षण घेऊ नये, असंही जरांगे पाटील म्हणाले. 

'ज्या ठिकाणी मराठा समाज आहे, त्या ठिकाणी मी जाणार आहे. मला सामान्य मराठ्यांचा पाठिंबा आहे, असंही जरांगे पाटील म्हणाले. 

केंद्रीय मंत्री नारायण राणे काय म्हणाले?

मराठा समाज वेगळा, कुणबी समाज वेगळा. मनोज जरांगे पाटील यांनी जरा अभ्यास करावा. मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र नको आहे, असे मत केंद्रीय मंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी गुरुवारी पत्र परिषदेत व्यक्त केले. 

राणे म्हणाले की, राज्य सरकारला एखाद्या जातीला आरक्षण द्यायचे असेल तर त्यासाठीच्या घटनात्मक तरतुदी काय आहेत याचाही जरांगे यांनी अभ्यास करावा. सरसकट कुणबी प्रमाणपत्र देता येणार नाही. ९६ कुळी मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र नको आहे. मी देखील मराठा आहे आणि मला कुणबी प्रमाणपत्र नको आहे. जरांगे  म्हणतात तसे मराठा आणि कुणबी एकच आहेत असे  म्हणणे योग्य ठरणार नाही.    

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलBJPभाजपाMaratha Reservationमराठा आरक्षणNarayan Raneनारायण राणे