थर्टी फर्स्टला येऊरमध्ये डीजे पार्ट्यांवर बंदी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2018 04:31 AM2018-12-24T04:31:38+5:302018-12-24T04:31:48+5:30

ठाण्यातील पर्यटनस्थळ असलेल्या येऊर येथील २५८ बंगलेधारकांसह सात हॉटेलमालकांना ठाणे शहर पोलिसांनी थर्टी फर्स्टला होणाऱ्या पार्ट्यांच्या पार्श्वभूमीवर नोटिसा बजावल्या आहेत.

 Thirty First ban on DJ parties in Yuor | थर्टी फर्स्टला येऊरमध्ये डीजे पार्ट्यांवर बंदी

थर्टी फर्स्टला येऊरमध्ये डीजे पार्ट्यांवर बंदी

Next

ठाणे  - ठाण्यातील पर्यटनस्थळ असलेल्या येऊर येथील २५८ बंगलेधारकांसह सात हॉटेलमालकांना ठाणे शहर पोलिसांनी थर्टी फर्स्टला होणाऱ्या पार्ट्यांच्या पार्श्वभूमीवर नोटिसा बजावल्या आहेत. या भागात मद्यविक्री आणि डीजे पार्ट्यांवरही बंदी घालण्यात आली आहे. त्याचबरोबर मद्यपान करून सुसाट गाड्या पळवणाºयांवरही विशेष लक्ष ठेवले जाणार आहे. त्यासाठी येऊर आणि उपवन येथे नाकाबंदी केली जाणार असून, भरारी पथकेही तैनात करण्यात येणार आहेत. या पार्ट्यांमध्ये गैरप्रकार घडल्यास संबंधित बंगलेधारक आणि आयोजकांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
नववर्ष स्वागताचे निमित्त करून ‘तळीराम’ दरवर्षी याठिकाणी पार्ट्यांसाठी आपला मोर्चा वळवतात. दारू पीत मोठ्या आवाजात बंगल्यामध्ये, हॉटेलच्या आवारात डीजे, स्पीकरवर गाणी लावून थर्टी फर्स्ट सेलिब्रेट करण्याचा ट्रेण्ड अनेक वर्षांपासून कायम आहे. यावर्षी मात्र प्रशासनाने डीजे, मद्यपानाला बंदी केली आहे. येथील २५८ बंगलेधारकांसह सात हॉटेलमालकांना वर्तकनगर पोलिसांनी मुंबई पोलीस अधिनियम १९५१ कलम ६८ अन्वये नोटिसा बजावल्या आहेत. यावेळी बंगले भाड्याने देताना काळजी घ्यावी, असे आवाहनही पोलिसांनी केले आहे. बंगल्यांमध्ये झालेल्या पार्ट्यांमध्ये गैरप्रकार घडल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा या नोटिशींद्वारे देण्यात आला आहे.

बंगलेधारकांवरही करणार कारवाई

येऊर परिसर हा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा भाग आहे. या परिसरात वन्यप्राण्यांचा वावर असल्याने हा परिसर सायलेन्स झोन (शांतता क्षेत्र) म्हणून घोषित केला आहे. तलावामुळे उपवनही पार्ट्यांसाठी ठाणेकरांच्या पसंतीचे ठिकाण बनले आहे. उपवन परिसरात केवळ थर्टी फर्स्टलाच नव्हे तर वर्षभर पार्ट्या रंगत असतात.

डीजे आणि स्पीकर, तसेच दारू किंवा अमली पदार्थांच्या पार्ट्यांना बंदी घातली आहे. या पार्ट्यांमध्ये गैरप्रकार झाल्यास बंगलेधारकांवर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. येऊर येथील २५८ बंगलेधारकांसह सात हॉटेलमालकांना नोटिसा बजावल्या आहेत. धूमस्टाइलने दुचाकी चालवणाºयांसह मद्यपी वाहकांवरही लक्ष ठेवण्यात येणार आहे. थर्टी फर्स्टसाठी दोन्ही परिसरांत नाकाबंदी आणि चौकाचौकांत बंदोबस्त लावण्यात येणार असून भरारी पथकही तयार केले आहे. - प्रदीप गिरधर,
वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वर्तकनगर

Web Title:  Thirty First ban on DJ parties in Yuor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे