शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

दीड महिन्यानंतरही ३८ हजार विद्यार्थी गणवेशाविना

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2019 15:41 IST

दीड महिन्यानंतर देखील ३० ते ४० टक्के विद्यार्थ्यांना गणवेशाचे पैसे मिळालेले नाही...  

ठळक मुद्देजुलै अखेरपर्यंत शंभर टक्के विद्यार्थ्यांना गणवेश मिळणार  प्रत्येक विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात अनुदानाची रक्कम जमा करण्याचा निर्णय

पुणे : महापालिकेच्या शाळा सुरु होऊन दीड महिन्यांचा कालावधी लोटला तरी अद्यापही तब्बल ३८ हजार ५०० विद्यार्थ्यांना गणवेशाचे पैसे मिळाले नाही. यामुळे जुने पुराणे गणवेश घालण्याची वेळ विद्यार्थ्यांवर आली आहे. येत्या जुलै अखेर पर्यंत शंभर टक्के विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा करण्यात येणार असल्याचा दावा प्रशासनाच्या वतीने करण्यात आला आहे.     गणवेश व शालेय साहित्य खरेदीमधील भ्रष्टाचार रोखण्यासाठी शासनाने थेट विद्यार्थी अथवा पालकांच्या बँक खात्यात अनुदानाचे पैसे जमा करण्याचा (डीबीटी) निर्णय घेतला. त्यानुसार गतवर्षीपासून महापालिकेच्या वतीने देखील प्रत्येक विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात अनुदानाची रक्कम जमा करण्याचा निर्णय घेतला. परंतु, पहिल्या वर्षी देखील हजारो विद्यार्थ्यांचे बँक खाते नसल्याने गणवेशाचे पैसे वाटप करण्यामध्ये अडचण आली होती. यंदा देखील दीड महिन्यानंतर देखील ३० ते ४० टक्के विद्यार्थ्यांना गणवेशाचे पैसे मिळालेले नाही.    महापालिकेच्या प्राधमिक शाळांमध्ये ८५ हजार विद्यार्थी आणि माध्यमिक शाळांमध्ये ११ हजार ५०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यापैकी आता पर्यंत सुमारे ५८ हजार विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांमध्ये ११ कोटी ५ लाख रुपयांचा निधी जमा करण्यात आला आहे.     याबाबत अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी सांगितले की, येत्या जुलै अखेरपर्यंत शंभर टक्के विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांमध्ये गणवेशाची रक्कम जमा करण्यात येणार आहे. सध्या काही विद्यार्थ्यांनी दोन-दोन शाळांमध्ये प्रवेश अर्ज केले आहे, तर काही विद्यार्थी खाजगी शाळांमध्ये प्रवेश घेतात. यामुळे अशा विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांमध्ये पैसे जमा करण्यास अडचण येते. तसेच इतर काही तांत्रिक कारणामुळे अडचणी येत आहेत, परंतु लवकरच शंभर टक्के विद्यार्थ्यांना गणवेळ मिळेल, असा दावा अग्रवाल यांनी केला.------------------महापालिकेच्या प्राथमिक शाळा : १०५प्राथमिक शाळांमधील विद्यार्थी संख्या : ८५ हजारगणवेशाचे पैसे बँक खात्यात जमा झालेले विद्याथीर् : ५१  हजारमाध्यमिक शाळा : १८ माध्यमिक शाळांचे एकूण विद्याथीर् : ११ हजार ५००आता पर्यंत बँक खात्यात पैसे जमा झालेले विद्यार्थी  : ७ हजार

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाSchoolशाळाStudentविद्यार्थी