नागरिकांनी जबाबदारीने वागल्यास कोरोनाची तिसरी लाट थोपवता येईल; चंद्रकांत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 02:37 PM2021-06-24T14:37:45+5:302021-06-24T14:37:51+5:30

क्रिएटिव्ह फाउंडेशन आणि मुकुल माधव फाउंडेशनच्या वतीने एस रुग्णालयात ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर सुविधा उपलब्ध करण्यात आली

A third wave of corona can be stop if citizens responsibly; Chandrakant Patil | नागरिकांनी जबाबदारीने वागल्यास कोरोनाची तिसरी लाट थोपवता येईल; चंद्रकांत पाटील

नागरिकांनी जबाबदारीने वागल्यास कोरोनाची तिसरी लाट थोपवता येईल; चंद्रकांत पाटील

Next
ठळक मुद्दे तिसरी लाट येऊच नये यासाठी आपण प्रार्थना करूयात. मात्र त्यासाठी सज्ज राहणे महत्वाचे

पुणे: कोरोना संकटकाळात अनेक डॉक्टर्स वा नर्सेसने आपल्या रुग्णालयाच्या माध्यमातून कर्तव्य बजावले. त्यामुळे कोरोना बऱ्यापैकी नियंत्रणात आला. मात्र नागरिकांनी आता जबाबदारीने वागल्यास कोरोनाची तिसरी लाट नक्कीच थोपवता येईल. असे आमदार चंद्रकांत पाटील यांनी सांगितले आहे. क्रिएटिव्ह फाउंडेशन आणि मुकुल माधव फाउंडेशन यांच्या वतीने एस रुग्णालयात मोफत ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरची सुविधा उपलब्ध करण्यात आली.  त्याप्रसंगी कार्यक्रमात ते बोलत होते. 

तिसरी लाट येऊच नये यासाठी आपण प्रार्थना करूयात. मात्र त्यासाठी सज्ज राहणे महत्वाचे आहे. असेही ते म्हणाले आहेत.

शहरात विविध ठिकाणी मोफत ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरची व्यवस्था करणार. 

दुसऱ्या लाटेत रेमडिसिवीर वा ऑक्सिजन हे परवलीचे शब्द झाले होते. त्यामुळे संभाव्य तिसऱ्या लाटेच्या वेळी कोणास ही ऑक्सिजन अभावी अडचण येऊ नये यासाठी विविध ठिकाणी मोफत ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर ची व्यवस्था करत असून प्रभाग 13 एरंडवणे येथील सरचिटणीस बाळासाहेब धनवे, निलेश गरुडकर व ऍड प्राची बगाटे ह्या ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरचे व्यवस्थापन करणार आहेत.

यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघांचे प्रांत कार्यवाह डॉ. प्रवीण दबडघाव, एस हॉस्पिटल चे डॉ. सुरेश पाटणकर, क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर, शिक्षण समिती अध्यक्ष नगरसेविका मंजुश्री खर्डेकर आणि पदाधिकारी  उपस्थित होते. 

Web Title: A third wave of corona can be stop if citizens responsibly; Chandrakant Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.