तृतीयपंथीयांना प्रवेश अर्जावर अधिकृत दर्जा

By Admin | Updated: June 30, 2014 23:45 IST2014-06-30T23:45:01+5:302014-06-30T23:45:01+5:30

चालू शैक्षणिक वर्षापासून फग्यरुसन महाविद्यालयाने तृतीयपंथीयांना प्रवेश अर्जावर अधिकृत दर्जा मिळवून दिला आहे.

Third party official status on admission application | तृतीयपंथीयांना प्रवेश अर्जावर अधिकृत दर्जा

तृतीयपंथीयांना प्रवेश अर्जावर अधिकृत दर्जा

>पुणो : चालू शैक्षणिक वर्षापासून फग्यरुसन महाविद्यालयाने तृतीयपंथीयांना प्रवेश अर्जावर अधिकृत दर्जा मिळवून दिला आहे. प्रवेश अर्जावर पहिल्यांदाच पुरुष, स्त्री याबरोबरच तृतीयपंथी हा पर्याय दिला आहे. अशा प्रकारे प्रवेश अर्जावर तृतीयपंथीयांसाठी वेगळा पर्याय देशात प्रथमच देण्यात आल्याचा दावा महाविद्यालयाने केला आहे.
सर्वोच्च न्यायालयाने तृतीयपंथीयांना दिलेल्या अधिकृत दर्जाच्या पाश्र्वभूमीवर फग्र्युसन महाविद्यालयानेही हा निर्णय घेतला आहे. त्यानुसार चालू शैक्षणिक वर्षापासून सर्वच अभ्यासक्रमांच्या प्रवेश अर्जावर पुरुष, स्त्री याबरोबर तृतीयपंथी असा पर्याय दिला आहे. महाविद्यालयाच्या ऑनलाइन प्रवेश अर्जामध्ये लिंग नोंदविताना ‘मेल’, ‘फिमेल’ आणि ‘ट्रान्सजेंडर’ अशी नोंद करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
याविषयी अधिक माहिती देताना महाविद्यालयाचे प्राचार्य रवींद्रसिंह परदेशी म्हणाले, की सर्वोच्च न्यायालयाने तृतीयपंथीयांना अधिकृत ओळख देण्याचा निर्णय दिल्यानंतर आम्हीही याबाबत विचारविनिमय केला. त्या वेळी प्रवेशाची तयारी सुरू होती. प्रवेश अर्जावर तृतीयपंथीयांनाही स्थान देण्याबाबत निर्णय घेण्यात आला. त्यानुसार सर्व अभ्यासक्रमांच्या ऑनलाईन अर्जावर तशी नोंद करण्यात आली आहे. पुरुष, स्त्री आणि तृतीयपंथी या तीनपैकी एक लिंग निवडून विद्याथ्र्याना आपला अर्ज सादर करता येत आहे. (प्रतिनिधी)
 
4अर्जामध्ये लिंग नोंदविताना ‘मेल’, ‘फिमेल’ आणि ‘ट्रान्सजेंडर’ अशी नोंद करण्याची सुविधा उपलब्ध.
4सर्वोच्च न्यायालयाने तृतीय पंथीयांना अधिकृत ओळख देण्याचा निर्णय दिल्यानंतर महाविद्यालयाकडून विचारविनिमय.
4सर्व अभ्यासक्रमांच्या ऑनलाईन अर्जावर तशी नोंद करण्यात आली आहे.
4पुरुष, स्त्री आणि तृतीयपंथी या तीनपैकी एक लिंग निवडून अर्ज सादर करता येणार.

Web Title: Third party official status on admission application

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.