चिखली परिसरात भुरट्या चोऱ्या

By Admin | Updated: January 11, 2017 03:03 IST2017-01-11T03:03:15+5:302017-01-11T03:03:15+5:30

येथील परिसरात मागील आठवड्यापासून अपरात्री, तसेच पहाटेच्या सुमारास दुकानांचे शटर उचकटून चोरी करण्याच्या

Thieves stolen in Chikhli area | चिखली परिसरात भुरट्या चोऱ्या

चिखली परिसरात भुरट्या चोऱ्या

चिखली : येथील परिसरात मागील आठवड्यापासून अपरात्री, तसेच पहाटेच्या सुमारास दुकानांचे शटर उचकटून चोरी करण्याच्या घटना घडत असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
चिखली येथील देहू-आळंदी रस्त्यावरील दीपचंद अंबालाल शहा, तसेच चिखली-आकुर्डी रस्त्यावरील शिवशक्ती ट्रेडर्स या होलसेल किराणा मालाच्या दुकानांचे शटर उचकटून चोरट्यांनी गल्ल्यातील किरकोळ रक्कम आणि महागड्या वस्तू चोरल्या आहेत. तसेच याच परिसरात असणाऱ्या केश कर्तनालयाचे शटर चोरट्यांनी उचकटले. अशा प्रकारे भुरट्या चोरीच्या घटना घडल्यामुळे व्यापारी व व्यावसायिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे.
अशा प्रकारच्या घटना वारंवार घडत असल्यामुळे चोरट्यांचे धाडस वाढले असल्याचे जाणवते. वाढत्या चोऱ्यांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी गस्तीपथकाची नेमणूक करून परिसरात रात्रीच्या आणि पहाटेच्या सुमारास गस्त घालावी, तसेच चोरीच्या प्रकारांना आळा घालावा, अशी मागणी भैरवनाथ व्यापारी संघटनेचे अध्यक्ष नवीन बग यांनी केली आहे. (वार्ताहर)

Web Title: Thieves stolen in Chikhli area