शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात चोरट्यांचा पोलिसांवर गोळीबार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2019 08:46 IST

सराफी दुकानाचे शटर उचकटून चोरी करण्याचा प्रयत्न करीत असतानाच तेथे पोलीस आल्याने चोरट्यांनी पोलिसांवर गोळीबार करुन कारमधून पलायन केले.

ठळक मुद्देसराफी दुकानाचे शटर उचकटून चोरी करण्याचा प्रयत्न करीत असतानाच तेथे पोलीस आल्याने चोरट्यांनी पोलिसांवर गोळीबार करुन कारमधून पलायन केले.बोपोडीतील भाऊ पाटील रस्त्यावरील वर्धमान ज्वेलर्सच्या समोर पहाटे सव्वाचार वाजता ही घटना घडली. खडकी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

पुणे - सराफी दुकानाचे शटर उचकटून चोरी करण्याचा प्रयत्न करीत असतानाच तेथे पोलीस आल्याने चोरट्यांनीपोलिसांवर गोळीबार करुन कारमधून पलायन केले. ही घटना बोपोडीतील भाऊ पाटील रस्त्यावरील वर्धमान ज्वेलर्सच्या समोर पहाटे सव्वाचार वाजता घडली. खडकी पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी माधव गोपनर व त्यांचे सहकारी स्वप्नील घोलप बुधवारी रात्री बीट मार्शल म्हणून नेमणूकीला होते. ते परिसरात गस्त घालत असताना पहाटे भाऊ पाटील रोडवर आले.

शिवाजी गार्डनजवळील रविराज अपार्टमेंटमध्ये वर्धमान ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. या दुकानाच्या बाहेर एक इनोव्हा कार उभी असल्याचे त्याना दिसून आले. गाडीचे लाईट चालू होते. त्याचवेळी त्यांचे लक्ष दुकानाकडे गेले. तेव्हा दोघे जण दुकानाचे शटर उचकटत असताना त्यांनी पाहिले. त्यांना पाहून चोरट्यांची घाबरगुंडी उडाली. ते घाईघाईत मोटारीकडे येऊ लागले. त्याचवेळी पोलीस पुढे आल्याने त्यांच्यातील एकाने गोपनर यांच्या दिशेने गोळी झाडली. ती त्यांनी चुकविली. गोळी बाजूला असलेल्या मोटारीला लागली. त्यानंतर चोरटे मोटारीतून पळून गेले. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. या मोटारीने आपले हेडलाईट चालू ठेवले असल्याने सीसीटीव्हीमध्ये त्यावरील नंबर दिसण्यास अडचण येत आहे. खडकी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसFiringगोळीबारThiefचोर