शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

मंदिरांचे कुलूप तोडून चोरटयांनी चांदीची मूर्ती व दागिने केले लंपास; खेड तालुक्यात चोरीच्या दोन घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 14:49 IST

या दोन्ही घटनेत १ लाख १४ हजाराचा ऐवज गेला चोरीला

राजगुरुनगर:  गारगोटवाडी (ता खेड ) येथे मंदिराचे कुलुप तोडून अज्ञात चोरट्यांनी देवाचे चांदीचे दागिने लांबविले. तसेच घनवट (ता खेड ) येथेही चोरट्यांनी मंदिरात प्रवेश देवाची चांदीची मूर्ती व मुखवटा लांबविला. या दोन्ही घटनेत सुमारे १ लाख १४ हजाराचा ऐवज चोरीला गेला आहे.ही घटना गुरुवारी (दि २ ) रोजी रात्रीच्या सुमारास घडली आहे. याबाबत अतुल ज्ञानेश्वर गारगोटे (रा. गारगोटवाडी,ता. खेड ) यांनी खेड पोलिस ठाण्यात दिली आहे.

याबाबत खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गारगोटवाडी येथे ग्रामपंचायत समोर मारुती मंदिर आहे. या मंदिरात मारूती देवाची मूर्ती व शंकराची पिंड आहे .पिंडीशेजारी भैरवनाथ देवाचे दोन मुखवटे होते. मंदिरात भाऊ गेणू गारगोटे हे पुजारी म्हणून काम पाहतात. सकाळी व संध्याकाळी देवाच्या पुजेसाठी ते मंदिर उघडतात. शुक्रवारी (दि २)  नेहमीप्रमाणे त्यांनी मंदिर बंद केले होते. रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी मंदिराच्या दरवाजाच्या कडी-कोयंडा कापून मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करून भैरवनाथ देवाचे सव्वादोन किलोचे ७० हजार रुपये किमतीचे चांदीचे दोन मुखवटे चोरट्यांनी लांबविले. दुसऱ्या दिवशी पुजारी गारगोटे हे मंदिरात पुजा करण्यासाठी गेले असता चोरीचा घटनासमोर आली. त्याच रात्री या परिसरातील १० किलोमीटर अंतरावर घनवटवाडी ( ता खेड ) येथे माथोबा देवाचे मंदिर आहे. या मंदिराचा दरवाजा उघडा होता. ही संधी चोरट्यांनी साधुन मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करून माथोबा देवाची पाव किलो चांदीची मूर्ती किंमत १० हजार रुपये ,तसेच देवाचा मुखवटा किंमत ३४ हजार रुपये असा एकूण १ लाख ३४ हजाराचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी लांबविला आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक राहूल लाड करत आहे.

टॅग्स :KhedखेडtheftचोरीPoliceपोलिसTempleमंदिर