‘त्या’ तरूणांकडून नुकसान भरपाई वसूल करणार

By Admin | Updated: June 12, 2014 05:11 IST2014-06-12T05:11:47+5:302014-06-12T05:11:47+5:30

फेसबुक बदनामी प्रकरणानंतर शहरात झालेल्या हिंसक घटनांमध्ये सार्वजनिक मालमत्तेचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे.

They will recover the compensation from those youths | ‘त्या’ तरूणांकडून नुकसान भरपाई वसूल करणार

‘त्या’ तरूणांकडून नुकसान भरपाई वसूल करणार

पुणे : फेसबुक बदनामी प्रकरणानंतर शहरात झालेल्या हिंसक घटनांमध्ये सार्वजनिक मालमत्तेचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. या घटनांमध्ये सहभागी झालेल्या मुलांच्या पालकांना पत्र पाठवून या कालावधीत झालेल्या सार्वजनिक मालमत्तेची नुकसान भरपाई त्यांच्याकडून वसूल केले जाणार असल्याचे पोलिस आयुक्त सतिश माथूर यांनी आज सांगितले.
मागील आठवडयात सोशल मीडियाच्या माध्यमातून महापुरुषांबाबत आक्षेपार्ह मजकूर आणि फोटो द्वारे विटंंबना करून ती प्रसिध्द झाल्यानंतत पुणे शहर तसेच जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये मोठया हिंसक घटना घडल्या होत्या या पाश्वर्भूमीवर पुणे महापालिका आणि पोलिस यांच्यावतीने आज महापालिकेत शांतता समितीची बैठक बोलाविण्यात आली होती. महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात ही बैठक झाली. त्यावेळी बोलताना माथूर यांनी ही माहिती दिली. बैठकीच्या निमंत्रक महापौर चंचला कोद्रे महापालिका आयुक्त विकास देशमुख, एमआयटीचे संस्थापक डॉ. विश्वनाथ कराड, यांच्यासह हिंदू आणि मुस्लिम संघटनांचे प्रतिनिधी, फुले शाहू आंबेडकर संघटनांचे प्रतिनिधी व नगरसेवक उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: They will recover the compensation from those youths

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.