शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

त्या दाेघांनी अवघ्या 310 रुपयांमध्ये बांधली रेशीमगाठ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2019 13:22 IST

अवघ्या 310 रुपयांमध्ये नाेंदणी पद्धतीने विवाह करुन पुण्यातील जाेडप्याने एक नवीन आदर्श समाजासमाेर उभा केला आहे.

पुणे : लग्न म्हंटलं की लाखाे रुपयांचा खर्च करण्याची पद्धत पाहायला मिळते. उंची डेकाेरेशन, विविध पदार्थांची मेजवाणी, मानपान, उंची कपडे असा सगळा थाटमाट लग्नांमध्ये पाहायला मिळताे. परंतु पुण्यातील एका जाेडप्याने अवघ्या 310 रुपयांमध्ये आयुष्यभराची रेशीमगाठ बांधली आहे. अहिरे गावातील विशाल चाैधरी आणि खडकवासला गावातील भाग्यश्री मते यांनी नाेंदणी पद्धतीने विवाह केला आहे. त्यांच्या विवाहाला केवळ 310 रुपये इतकाच खर्च आला. लग्नासाठी हाेणारा वायफळ खर्च टाळून ताे भविष्यासाठी, शिक्षणासाठी वापरण्यात यावा असा संदेश या निमित्ताने दाेघांनी दिला आहे. 

महात्मा फुले यांनी त्यांच्या शेतकऱ्याचा असूड या पुस्तकामध्ये लग्न कार्यात हाेणाऱ्या अनाठायी खर्चामुळे येणारे दारिद्र, हाेणारा वायफळ खर्च याबाबत लिखान केले आहे. महात्मा फुलेंचा आदर्श घेत पुण्यातील जाेडप्याने साध्या पद्धतीने विवाह करण्याचा निर्णय घेतला. महात्मा फुलेंचे पुस्तक वाचताना लग्नावर हाेणार खर्च टाळण्याचा निर्णय विशालने घेतला. याबाबत त्याने स्वतःच्या घरी तसेच मुलीच्या घरी याबाबत सांगितले. सुरुवातीला दाेघांना दाेन्हीकडच्या नातेवाईकांच्या राेषाला सामाेरे जावे लागले. नाेंदणी पद्धतीने लग्न केल्यानंतर आळंदीला जाऊन साध्या पद्धतीने लग्न करण्याबाबतही नातेवाईकांनी गळ घातली. परंतु ते ही मान्य न करता केवळ नाेंदणी पद्धतीने लग्न करण्याचा निर्णय दाेघांनी घेतला. साेमवारी दाेघांनी विवाह केला. 

विशाल आणि भाग्यश्री हे मराठा समाजातील आहे. दाेघेही उच्चशिक्षित आहेत. लग्नावर हाेणारा वारेमाप खर्च त्यांना मान्य नाही. गेल्या अनेक वर्षांपासून ते सामाजिक कार्य देखील करत आहेत. साध्या पद्धतीने लग्न करुन त्यांना समाजात एक आदर्श घालून द्यायचा हाेता. केवळ लग्नसाठी जमीन विकून कर्जबाजारी झालेल्या लाेकांची अनेक उदाहरणे समाजात आहेत. त्यामुळे महात्मा फुलेंनी ज्या पद्धतीने साध्या पद्धतीने लग्न करण्याचा विचार दिला, त्याला अनुसरुन या जाेडप्याने एक नवीन पायंडा समाजात घातला आहे.  

टॅग्स :Puneपुणेmarriageलग्नmarathaमराठा