शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

सहजीवनाच्या प्रवासाला पुन्हा सुर त्यांचे जुळले 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2018 15:23 IST

तीन वर्षांपासून मतभेदांमुळे वेगवेगळे राहत असलेल्या पती-पत्नीने महालोकअदालतमध्ये झालेल्या समुपदेशात पुन्हा एकत्र राहण्याचा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्दे रविवारी झालेल्या महालोकअदालतमध्ये दोघांचे समुपदेशन

पुणे : लग्न संस्थेतून आयुष्यभरासाठी जोडल्या गेलेल्या नात्याची परिपूर्णता समजुतदारपणात सामावलेली असते. सहजीवनाच्या पातळीवर काहीवेळा नात्यांचे धागे हळूहळू गुंफले जातात. काही साथीदारांच्या जीवनात या कधी नात्याचे बंध विरहातून घट्ट होत जाते. असाच काहीसा अनुभव तीन वर्षांपासून मतभेदांमुळे वेगवेगळे राहत असलेल्या पती-पत्नीने महालोकअदालतमध्ये झालेल्या समुपदेशात पुन्हा एकत्र राहण्याचा निर्णय घेतला आहे. समुपदेशातून त्यांचे वाद मिटले असून त्यांनी नव्याने आपल्या संसाराला सुरुवात केली.     थोरामोठ्यांच्या आशीवार्दाने त्यांचे लग्न झाले. मात्र, लग्न झाल्यानंतर काही महिन्यांतच त्यांच्यात वाद होऊ लागला. त्यांच्यात वैचारिक मतभेद निर्माण झाले. त्यामुळे सुरेखा अनेक दिवस माहेरी होती. तर मी तिला नांदवणारच नाही, अशी भूमिका सुरेश याने घेतली होती. भविष्याचा विचार करत दोघांनीही न्यायमूर्ती व्ही.आर. जगदाळे यांच्या पॅनेलमसमोर हे सकारात्मक पाऊ ल टाकले आहे. सुरेश आणि सुरेखा (नावे बदलेली) असे त्या दोघांची नावे आहेत. त्यात सुरेखापासून घटस्फोट मिळावा म्हणून सुरेशने शिवाजीनगर न्यायालयात २०१५ साली अर्जही दाखल केला होता. तेव्हापासून ते वेगवेगळे राहत होते. दरम्यान, रविवारी झालेल्या महालोकअदालतमध्ये न्यायमूर्ती जगदाळे यांच्या पॅनेलसमोर दोघांचे समुपदेशन करण्यात आले. त्यावेळी दोघांनी भविष्याचा विचार करत झाले-गेलेले विसरून नव्याने पुन्हा संसार सुरू करण्याचा निर्णय घेतला. याप्रकरणी न्यायमूर्ती व्ही.आर. जगदाळे , सुरेश यांचे वकील अ‍ॅड. संतोष काशिद, अ‍ॅड. सुनील क्षीरसागर यांनी तडजोडीसाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. 

टॅग्स :Puneपुणेrelationshipरिलेशनशिपmarriageलग्नCourtन्यायालय