शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
2
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
3
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
4
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
5
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
6
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
7
चातुर्मास कधी संपणार? पाहा, विष्णुप्रबोधोत्सव, कार्तिकी एकादशीचे महत्त्व, महात्म्य, मान्यता
8
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
9
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
10
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट
11
टीव्हीवरचं लोकप्रिय कपल, लग्नाच्या १४ वर्षांनी जय भानुशाली-माही विजचा घटस्फोट?
12
फक्त आरोग्य विमा काढणे पुरेसे नाही? 'या' एका नियमामुळे तुमचा क्लेम रिजेक्ट होईल, खिशाला बसेल भुर्दंड
13
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
14
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
15
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
16
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
17
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
18
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
19
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
20
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच

शिक्षणात रोवतोय त्यांचाही ‘पाय’ : राष्ट्रीय सेरेब्रल पाल्सी दिन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2018 18:59 IST

सेरेब्रल पाल्सी हा मेंदुशी संबंधित विकार आहे. मेंदुला आघात झाल्यामुळे आकलनक्षमता, शिकणे, बुद्धी, स्वभाव, वाचा, हात, पायांच्या हालचाली यांसह अन्य बाबींवर परिणाम होतो...

ठळक मुद्देहा विकार पुर्णपणे बरा होत नसला तरी त्यात सुधारणा होऊ शकते.स्नायूंची शक्ती, त्याचे नियमन आणि अतिरिक्त ताठरतेमुळे हालचालींवर मर्यादा संघटनेतर्फे दरवर्षी एक संकल्पना घेऊन त्याविषयी जनजागृती विशेष शाळा निर्माण झाल्यास त्यांच्या पंखांना आणखी बळ

राजानंद मोरेपुणे : सेरेब्रल पाल्सी या विकारामुळे स्नायूंच्या हालचालीवर मर्यादा आल्याने अनेक मुलांना इतरांप्रमाणे खेळता-बागडा येत नाही. मग त्यांच्याप्रमाणे शिक्षण मिळणे तर लांबच. भलेही समाज त्यांच्याकडे वेगळ्या दृष्टीने पाहतो, पण त्यातील अनेक मुलं शिक्षणाच्या वाटेवर चालु लागली आहेत. अनंत अडचणींवर मात करत पुढे जात आहेत. मागील दोन वर्षातील इयत्ता दहावी-बारावीच्या निकालावरून याची जाणीव होते. पण अजूनही चांगल्या सोयी-सुविधा मिळाल्यास, विशेष शाळा निर्माण झाल्यास त्यांच्या पंखांना आणखी बळ मिळेल, अशी अपेक्षा या क्षेत्रातील तज्ज्ञ करीत आहेत.‘इंडियन अ‍ॅकॅडमी आॅफ सेरेब्रल पाल्सी’ या संघटनेतर्फे २०१० या वर्षापासून दि. ३ आॅक्टोबर हा दिवस ‘राष्ट्रीय सेरेब्रल पाल्सी दिन’ म्हणून साजरा केला जातो. संघटनेतर्फे दरवर्षी एक संकल्पना घेऊन त्याविषयी जनजागृती केली जाते. यावर्षी ‘एनेबल डु नॉट लेबल’ ही संकल्पना घेण्यात आली आहे. सेरेब्रल पाल्सी असलेल्या मुलांमधील सकारात्मक बाजू, चांगल्या बाबी लक्षात घेऊन त्यांना पुढे जाण्यासाठी प्रोत्साहित करणे हा त्यामागचा उद्देश आहे. सेरेब्रल पाल्सी हा मेंदुशी संबंधित विकार आहे. या विकारामुळे स्नायूंची शक्ती, त्याचे नियमन आणि अतिरिक्त ताठरतेमुळे हालचालींवर मर्यादा येतात. मेंदुला आघात झाल्यामुळे आकलनक्षमता, शिकणे, बुद्धी, स्वभाव, वाचा, हात, पायांच्या हालचाली यांसह अन्य बाबींवर परिणाम होतो. हा विकार पुर्णपणे बरा होत नसला तरी त्यात सुधारणा होऊ शकते. याबाबत मागील काही वर्षात पालकांमध्ये जनजागृती वाढत चालली आहे. या मुलांना शिक्षण देणे, त्यांच्यामध्ये इतर मुलांप्रमाणेच त्याबाबतची भावना निर्माण करण्यासाठी पालक पुढे येत आहेत.महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत सेरेब्रल पाल्सीसह इतर दिव्यांग मुलांसाठी परीक्षेमध्ये विशेष सवलत दिली जाते. मार्च २०१७ मध्ये झालेल्या परीक्षेच्या तुलनेत मार्च २०१८ मध्ये झालेल्या इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेतील सेरेब्रल पाल्सीच्या मुलांची संख्या वाढली आहे. या विद्यार्थ्यांचे उत्तीर्णतेचे प्रमाणही खुप चांगले आहे. इयत्ता बारावीनंतर अनेक विद्यार्थी उच्च शिक्षणही घेतात. मात्र, अनेकदा शिक्षण घेताना त्यांना अनंत अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे अनेकांना पुढे शिक्षण घेता येत नाही. ...........................सेरेब्रल पाल्सीच्या विद्यार्थ्यांना सर्वसामान्य विद्यार्थ्यांप्रमाणे त्यांच्यासोबत शिक्षण घेणे शक्य होत नाही. शाळांमध्ये रॅम्प नसतो. त्यांना विशेष शिक्षकांची गरज असते. त्यांच्यासाठी विशेष शाळाच आवश्यक आहेत. यामध्ये त्यांच्यादृष्टीने सर्व आवश्यक सोयी-सुविधा मिळू शकतात. पण मागील काही वर्षांपासून पालक, शिक्षणसंस्थाही सजग झाल्या आहेत. एका विद्यार्थ्यासाठी महाविद्यालयाने पहिल्या मजल्यावरील वर्ग तळमजल्यावर केल्याचीही उदाहरणे आहेत.- पुजा गायवळ, मुख्याध्यापिका............................इंटरविडा स्कुलसेरेब्रल पाल्सी लवकर लक्षात आल्यास त्याच्यावर नवनवीन उपचार पध्दतींद्वारे नियंत्रण ठेवता येणे शक्य झाले आहे. त्यामुळे या मुलांच्या स्थितीमध्ये खुप सुधारणा झाली आहे. हा आजार पुर्णपणे बरा होत नसला तरी सुधारणा करणे शक्य आहे. त्यामुळे ते शिकु शकतात. पालकही आता जागृत झाले आहेत.- डॉ. माधवी केळापुरे, खजिनदारइंडियन अ‍ॅकॅडमी आॅफ सेरेब्रल पाल्सी

------------दहावी व बारावीच्या निकालाची स्थिती        वर्ष             मार्च २०१७                      मार्च २०१८    इयत्ता दहावी     परीक्षा दिली       १५७          १९६        उत्तीर्ण                                 १४१          १७२इयत्ता बारावी    परीक्षा दिली       ११६         १२३        उत्तीर्ण                                १०९        १११------------------- 

टॅग्स :PuneपुणेEducationशिक्षणSchoolशाळा