शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्राला अभिमान वाटेल असे खेळाडू घडतील, पुण्यातील स्डेडियमला नीरज चोप्राचे नाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2021 19:44 IST

आपण दिलेल्या सन्मानाबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो. या स्डेडियममधून देशाला अभिमान वाटेल असे खेळाडू घडतील, येथून ते प्रेरणा घेतील, असे नीरज चोप्राने म्हटले आहे. तसेच, संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांचेही ट्विटरवरुन आभार मानले.  

ठळक मुद्दे  संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्याहस्ते आज ‘आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूट’ मधील ‘ॲथलेटिक्स स्टेडियम’ला नीरज चोप्रा हे नाव देण्यात आले

पुणे - लष्कराच्या पुण्यातील दक्षिण मुख्यालयाच्या घोरपडी येथील ‘आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूट’ मधील ‘ॲथलेटिक्स स्टेडियम’ला सुवर्णपदकविजेता भालाफेकपटू नीरज चोप्रा याचे नाव देण्यात आले. संरक्षणमंत्री राजनाथसिंह आणि लष्करप्रमुख जनरल एम.एन. नरवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा नामकरण सोहळा पार पडला. या नामकरणाबद्दल टोकियो ऑलिंपिक विजेता नीरज चोप्राने आभार मानत कृतज्ञता व्यक्त केली. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्याहस्ते आज ‘आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूट’ मधील ‘ॲथलेटिक्स स्टेडियम’ला नीरज चोप्रा हे नाव देण्यात आले. यावेळी लष्करप्रमुख जनरल एम. एम. नरवणे व दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल जे. एस. नैन उपस्थित होते. या प्रसंगी टोकियो ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या लष्कराच्या सोळा खेळाडूंचा गौरव संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते गौरवही करण्या आला. तसेच, सुभेदार नीरज चोप्राचाही विशेष गौरव करण्यात आला.  आपण दिलेल्या सन्मानाबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो. या स्डेडियममधून देशाला अभिमान वाटेल असे खेळाडू घडतील, येथून ते प्रेरणा घेतील, असे नीरज चोप्राने म्हटले आहे. तसेच, संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांचेही ट्विटरवरुन आभार मानले.  २००६ साली उभारण्यात आलं स्टेडियम

‘आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूट’मध्ये हे स्टेडियम २००६ साली उभारण्यात आले. या स्टेडियममध्ये ४०० मीटरचा सिंथेटिक ट्रॅक आहे. लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाचा सुभेदार असलेल्या नीरज चोप्राने या संस्थेत भालाफेकीचे प्राथमिक प्रशिक्षण घेतले होते. त्याच्या ऐतिहासिक कामगिरीच्या गौरवार्थ या संस्थेतील ‘ॲथलेटिक्स स्टेडियम’ आता ‘नीरज चोप्रा आर्मी स्पोर्ट्स स्टेडियम, पुणे कँटोन्मेंट’ म्हणून ओळखले जाणार आहे. येथे प्रशिक्षण घेणाऱ्या तरुण ‘ॲथलेटिक्स’ना या नावातून नक्कीच प्रेरणा मिळणार आहे.

भारत आर्थिक सुपर पॉवर बनू शकतो 

आपल्याकडे अत्याधुनिक तंत्रज्ञान तसेच उच्च विद्याविभुषित शास्त्रज्ञ आहेत. भारत केवळ सुपर पॉवरच नाही तर आर्थिक सुपर पॉवर बनू शकतो. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आत्मनिर्भर भारत बनवण्याचे स्वप्न आहे. संरक्षण संस्था व आधुनिक तंत्रज्ञान (डीआयएटी) संस्थेतील शास्त्रज्ञांकडे पाहून ते नक्की पूर्ण होईल, असा विश्वास संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी पुण्यात व्यक्त केला. पुण्यातील खडकवासला येथील डीआयएटी संस्थेतील कार्यक्रमात ते बोलत होते. 

टॅग्स :PuneपुणेNeeraj Chopraनीरज चोप्राIndian Armyभारतीय जवानnda puneएनडीए पुणे