खराडी-चंदननगरमध्ये बदल घडणार
By Admin | Updated: February 15, 2017 02:37 IST2017-02-15T02:37:14+5:302017-02-15T02:37:14+5:30
‘खराडी-चंदननगरमधील जनतेने एक बदल घडवावा, येथे सारे बदल सहज घडतील,’ असे आवाहन शिवसेनेचे उमेदवार संतोष भरणे

खराडी-चंदननगरमध्ये बदल घडणार
पुणे : ‘खराडी-चंदननगरमधील जनतेने एक बदल घडवावा, येथे सारे बदल सहज घडतील,’ असे आवाहन शिवसेनेचे उमेदवार संतोष भरणे यांनी केले.
भरणे म्हणाले, ‘शिवसेनेचे धोरण आणि व्हिजन स्पष्ट आहे. या भागातील जनतेच्या समस्यांची पूर्ण माहिती आहे. कार्यकर्त्यांमधून तयार झालेले उमेदवार सेनेने दिले आहेत. शिवसेनेने येथे झंझावात तयार केला असून, येथे भगवी लाट आली आहे. ही लाट आता कोणताही पक्ष थोपवू शकत नाही. जनतेने येथील निवडणूक हातात घेतली आहे. जनतेला कोणीही सदासर्वकाळ उल्लू बनवू शकत नाही. सत्ताधाऱ्यांना धडा शिकविण्याचा निर्धार मतदारांनी केला आहे.
जनतेत सातत्याने राहून त्यांचे काम करणाऱ्या शिवसेनेचा मोठा आधार खराडीत निर्माण झाला आहे. त्यामुळेच शिवसेनेचा पाठिंबा वाढत आहे. महाराष्ट्र बहुजन मुस्लिम भीम सेना संघाच्या पाठिंब्याने शिवसेनेची ताकद दुप्पट झाल्याचे भरणे यांनी सांगितले.
शिवसेनेचे चार उमेदवार संतोष भरणे, संध्या पठारे, मीनाक्षी शेजवळ व सुनील थोरात यांनी पठारे-ढुबेनगर, दिनकर पठारेवस्तीत पदयात्रा काढून मतदारांशी संवाद साधला. या वेळी धीरज पठारे, गुलाब पठारे, कानिफ भरणे, सुरेश शेजवळ, मंगेश गायकवाड, अक्षय साबळे, संदीप खुळे, प्रसाद शेजवळ, दादा पठारे, विजय चव्हाण, कुष्णा मोरे, सतीश पठारे, अनिल भुजबळ, विजय दौंडकर, तृप्तीताई भरणे, अविधा थोरात, सुनीता जाधव, सारिका शिंदे, सुजाता आतकरे, सुजाता नाईक, सई भरणे, ज्ञानेश्वरी विरोळे यांनी पदयात्रेत शिवसेनेला विजयी करण्याचे आवाहन केले. (प्रतिनिधी)