Pune Corona Update: बुधवारी शहरात केवळ ६५ रुग्ण, एकही मृत्यू नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2022 21:20 IST2022-03-02T21:20:00+5:302022-03-02T21:20:09+5:30
शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या ९४३ झाली आहे

Pune Corona Update: बुधवारी शहरात केवळ ६५ रुग्ण, एकही मृत्यू नाही
पुणे : शहरातील कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने खाली येत आहे. शहरात रविवारी २ हजार ७७८ चाचण्या पार पडल्या. त्यापैैकी ६५ कोरोनाबाधितांचे निदान झाले. शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या ९४३ झाली आहे. बुधवारी एकाही कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला नाही.
सध्या १४ रुग्ण व्हेंटिलेटरवर तर ६२ रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. शहरात ५०७ व्हेंटिलेटर बेड, ४०७८ ऑक्सिजन बेड उपलब्ध आहेत. शहरात आजवर ४४ लाख ९३ हजार २२८ कोरोना चाचण्या झाल्या. त्यापैैकी ६ लाख ६० हजार ५९६ कोरोनाबाधितांची नोंद झाली. त्यापैैकी ६ लाख ५० हजार ३०८ रुग्ण कोरोनामुक्त झाले. आजवर ९३४५ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.