शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

‘माळेगाव’ ची निवडणूक स्थानिक;यात टोकाची भूमिका घेण्याची गरज नव्हती- शरद पवार यांचे मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 15:47 IST

या घडामोडींवर ज्येष्ठ नेते  शरद पवार यांनी माध्यमांशी बोलताना माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या  निवडणूक स्थानिक असून, यात टोकाची भूमिका घेण्याची गरज नव्हती, असे मत व्यक्त केले आहे.

बारामती - उपमुख्यमंत्री अजित पवार माळेगांव निवडणुकीच्या आखाड्यात स्वत: उतरत ‘ब’ वर्ग मतदारसंघातून अर्ज दाखल केला आहे.शिवाय आगामी पाच वर्ष कारखान्याचे चेअरमन म्हणुन देखील उपमुख्यमंत्री यांनी स्वत:च्याच नावाची घोषणा केली आहे.त्यामुळे माळेगांव कारखान्याची निवडणुक लक्षवेधी ठरली आहे.या घडामोडींवर ज्येष्ठ नेते  शरद पवार यांनी माध्यमांशी बोलताना माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या  निवडणूक स्थानिक असून, यात टोकाची भूमिका घेण्याची गरज नव्हती, असे मत व्यक्त केले आहे.ज्येष्ठ नेते पवार यांनी आगामी दोन दिवसांत बारामती परीसरात विविध कार्यक्रम आहेत. या पार्श्वभुमीवर पवार हे बारामती दाैर्यावर आहेत.बुधवारी(दि १८) माळेगांव येथील गोविंदबाग निवासस`थानी पत्रकारांशी बोलताना पवार यांनी उपमुख्यमंत्री पवार यांंच्या स्वत: उमेदवार अर्ज दाखल करण्याच्या भुमिकेवर हे मत व्यक्त केले आहे.पवार म्हणाले, 'या निवडणुकीकडे राज्याकडं राज्याचे लक्ष लागलं आहे असं कसे म्हणता येईल? हा स्थानिक प्रश्न आहे." याचा अर्थ, ही निवडणूक फक्त स्थानिक पातळीवरची आहे.याकडे राज्याने लक्ष देण्याची गरज नाही. आजू बाजूला जे तालुके आहेत त्यांचे लक्ष इथे नाही. या निवडणुकीत आमची टोकाची भूमिका घ्यायची इच्छा नव्हती आजही नाही. म्हणजे, आसपासच्या तालुक्यांचेही या निवडणुकीकडे लक्ष नाही.एक विशिष्ट स्थिती झाली. लोकांना सोबत घ्यायचा दृष्टिकोन ठेवला असता तर ही परिस्थिती आली नसती, पण ठीक हे झालं हे झालं. आजचा १९००० सभासदांचा प्रश्न आहे," असे पवार म्हणाले. याचा अर्थ, लोकांना सोबत घेतले असते, तर वेगळी परिस्थिती असती. आता १९ हजार सभासदांचा प्रश्न आहे. बारामतीमध्ये सूतगिरणी का झाली नाही, याबद्दल बोलताना ते म्हणाले, "बारामतीत सूतगिरणी झालीच नाही. एकेकाळी बारामती हा कापसाचा भाग होता परंतु आता कापूस इथे राहिला नाही." म्हणजे, पूर्वी बारामती कापसासाठी ओळखली जात होती, पण आता तिथे कापूस नसल्याचे म्हणाले.महाराष्ट्र सरकारने घेतलेल्या अेआयच्या निर्णयाबद्दल ते म्हणाले, महाराष्ट्र सरकारने काल ५०० कोटीचा निर्णय घेतला आहे. ऊस आणि बाकीचे पिके वापरण्याचे धोरण फायनल केलं. हा फायद्याचे असेल म्हणून निर्णय घेतला. तसेच,देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन करतो. त्यांनी निर्णय करण्याचे धाडस दाखवलं त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. देशात पहिलं राज्य आहे की एआय स्वीकारत आहे, त्यामुळे मी सरकारचे अभिनंदन करतो,अशा शब्दात पवार यांनी सरकारचे काैतुक  केले.

टॅग्स :PuneपुणेSharad Pawarशरद पवारpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्र