शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी रोहित पवारांची भूमिका, अन्याय होता कामा नये

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2021 18:56 IST

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी आणि जे दोषी होतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल. मात्र, या गोष्टीचे राजकारण करू नये असं राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी म्हटले.

ठळक मुद्देपूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी आणि जे दोषी होतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल. मात्र, या गोष्टीचे राजकारण करू नये असं राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी म्हटले.

पुणे - पूजा चव्हाणआत्महत्या प्रकरणात शिवसेना नेते आणि मंत्री संजय राठोड यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. या प्रकरणात पोलीस पुरेशा गांभीर्यानं कारवाई करत नसल्याचं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. पोलिसांवर दबाव असल्याचा आरोपही विरोधी पक्षनेत्यांनी केला आहे. याआधी फडणवीस यांनी १२ ऑडिओ क्लिप्स पोलीस महासंचालकांकडे पाठवल्या आहेत, तसेच पत्र लिहून कारवाईची मागणीही केली आहे. त्यामुळे राठोड यांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची दाट शक्यता आहे. (Devendra Fadnavis reaction on Pooja Chavan Suicide Case) आता, राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनीही याप्रकरणी चव्हाण कुटुंबीयांवर अन्याय होऊ नये असे म्हटले आहे. 

पूजा चव्हाणआत्महत्या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी आणि जे दोषी होतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल. मात्र, या गोष्टीचे राजकारण करू नये असं राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी म्हटले. पुण्यामध्ये मांजरी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत जाऊन त्यांनी आज शेतकऱ्यांसोबत संवाद साधत वाद व्हॅलेंटाईन डे साजरा केला. यावेळी बोलताना त्यांनी पूजा चव्हाण प्रकरणावर प्रतिक्रिया दिली. या सगळ्या प्रकरणांमध्ये मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिलेच आहे. तसेच सत्य समोर येईलच. पण, पूजा चव्हाण यांच्या कुटुंबावरही अन्याय होता कामा नये, अशीही भूमिका त्यांनी घेतली. दरम्यान, माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी न्याय व्यवस्थेविषयी जे वक्तव्य केले, ते भीतीदायक असून सामान्य माणसांचा न्यायव्यवस्थेवरचा विश्‍वास कमी होऊ नये असेही रोहित पवार यांनी म्हटले.

उद्धव ठाकरेंनीही दिली प्रतिक्रिया

पूजा चव्हाण प्रकरणात शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांचं नाव समोर आल्यानंतर मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना प्रश्न विचारण्यात आले. त्यावेळी चौकशी केली जाईल. चौकशीमध्ये सत्य काय ते समोर येईलच. मात्र, त्याच वेळी मागे झाला तसा कुणाला आयुष्यातून उठवण्याचा प्रयत्न होत असेल तर तेही योग्य नाही, असं ठाकरे म्हणाले. सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांच्या संदर्भानं मुख्यमंत्र्यांनी हे विधान केल्याचं मानलं जातं.

पोलिसांवर दबाव, फडणवीसांचा आरोप

पूजा चव्हाण प्रकरणात पोलिसांकडून गांभीर्यानं कारवाई होताना दिसत नाही. पोलिसांकडे ऑडिओ क्लिप आहेत. त्यातला आवाज कोणाचा आहे, हे सगळ्यांना माहिती आहे. मात्र पोलिसांनी तो आवाज कोणाचा आहे, ते सांगायला हवं. सत्य लोकांसमोर यायला हवं. पण पोलिसांवर दबाव असल्यानं त्यांच्याकडून सत्य लपवलं जातं आहे, असं फडणवीस म्हणाले. नागपुरात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू करायला हवा, असं मत त्यांनी व्यक्त केलं. राठोड यांच्यावर झालेले आरोप पाहता चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांनी राजीनामा द्यायला हवा, असा प्रश्न फडणवीस यांना विचारण्यात आला. त्यावर पोलीस कारवाई करत नाहीत, तोपर्यंत त्यांच्यासाठी मैदान खुलं आहे. पोलिसांवरील दबाव दूर व्हायला हवा आणि सत्य समोर यायला हवं, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

मुख्यमंत्र्याच्या विधानावर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेना कदाचित घटनेचं गांभीर्य लक्षात आलेलं नसावं. त्यांनी कदाचित या प्रकरणातल्या ऑडिओ क्लिप ऐकल्या नसाव्यात किंवा नीट माहिती घेतलेली नसावी. त्यांनी ऑडिओ क्लीप नीट ऐकल्या तर त्यांना कोणाचं आयुष्य उद्ध्वस्त होतंय ते समजेल, असं फडणवीस म्हणाले. 

टॅग्स :Suicideआत्महत्याRohit Pawarरोहित पवारSanjay Rathodसंजय राठोडPooja Chavanपूजा चव्हाण