शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्र्म्प आणि युक्रेनच्या झेलेन्स्कींचे पुन्हा जोरदार भांडण; नकाशा बाजुला फेकला... 
2
हाँगकाँगमध्ये UAE चे कार्गो प्लेन रनवेवरून समुद्रात घसरले; विमानातील कर्मचारी वाचले, पण दोन ग्राउंड स्टाफचा मृत्यू
3
दिवाळी सुरु नाही झाली तोच दिल्लीची हवा अतिविषारी बनली; आनंद विहारमध्ये गुणवत्ता ४१७ वर...
4
ट्रम्पविरोधात अमेरिकन पेटून उठले, ‘नो किंग्ज’ म्हणत रस्त्यावर उतरले! सरकारी हुकुमशाहीचा विरोध
5
आजचे राशीभविष्य : सोमवार २० ऑक्टोबर २०२५; आजचा दिवस व्यापार-व्यवसायासाठी लाभदायी, जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठीही अनुकूल
6
महाराष्ट्राला केंद्राकडून १,५६६ कोटी मदत; अमित शाह यांची घोषणा, CM फडणवीसांनी मानले आभार
7
परकीयांनी आधी विध्वंस करून लुटले, तर नंतर आलेल्यांनी बुद्धीला लुटले: सरसंघचालक मोहन भागवत
8
राज्यात ९६ लाख खोटे मतदार; राज ठाकरेंचा आरोप, निवडणुका शांततेत हव्या तर मतदार याद्या स्वच्छ करा
9
नितीशकुमारच एनडीएचे सर्वसहमतीचे नेते असतील; अमित शाह यांच्या वक्तव्यानंतर जदयूचा दावा
10
काय सांगता! १८६ कार खरेदी, तब्बल २१ कोटींचा डिस्काऊंट दिला; ऑडी, BMW, मर्सिडिज घेतल्या
11
झामुमोने दिला ‘एकला चलो’चा नारा; महाआघाडी आता फुटीच्या उंबरठ्यावर, जागावाटपावरून मतभेद
12
बिहार निवडणूक २०२५: निवडणूक आयोगाची ‘आर्थिक गुप्तचर समिती’ ६ वर्षांनी पुन्हा सक्रिय
13
आरोपीच्या वकिलाने ५०० पानी अर्ज केला, न्यायालयाने जामीन फेटाळला; नेमके प्रकरण काय?
14
चांदी स्थिरावणार, सोने भाव खाणार; चांदीचा प्रीमियम उतरला २५ हजारांवरून शून्यावर
15
पॅरिसच्या लूव्र म्युझियममध्ये ४ मिनिटांत नेपोलियन तिसरा याच्या ९ मौल्यवान वस्तू लांबवल्या
16
पाकिस्तान-अफगाण शस्त्रसंधीसाठी राजी; संघर्ष थांबणार, दोहा येथे वाटाघाटी
17
सध्या 'मनोमिलन' नाटकाचं जोरदार प्रमोशन सुरू; एकनाथ शिंदेंचा उद्धव अन् राज ठाकरेंना टोला
18
India Still Qualify For Semifinals : टीम इंडियासाठी कसं आहे सेमीचं समीकरण? जाणून घ्या सविस्तर
19
बांगलादेशी सैन्याची चाल, भारतासाठी धोक्याची घंटा; 'चिकन नेक'जवळ तैनात होणार चीनची लढाऊ विमाने?
20
ओबीसींना राजकारणापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र हाणून पाडले - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

लसीसाठी ८० हजार कोटी आहेत का? पुनावाला यांचा पंतप्रधान मोदींना प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2020 05:36 IST

‘सीरम’च्या अदर पुनावाला यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रश्न

पुणे : भारतातील प्रत्येकाला कोरोनाची लस देण्यासाठी सरकारकडे पुढील वर्षभरात ८० हजार कोटी रुपये उपलब्ध होऊ शकतील का, असा प्रश्न सीरम इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टिष्ट्वटरद्वारे विचारला आहे. हा निधी उभारण्याचे मोठे आव्हान आपल्यासमोर असेल, असे पुनावाला यांनी म्हटले आहे. हे टिष्ट्वट पंतप्रधान कार्यालय म्हणजेच नरेंद्र मोदी आणि केंद्रीय आरोग्य मंत्रालय या दोघांना टॅग केले आहे.

सीरम इन्स्टिट्यूटकडून कोविशिल्ड, कोडाजेनिक्स आणि नोव्हावॅक्स या तीन लसींचे उत्पादन केले जाणार आहे. सीरम ही जगातील सर्वात मोठी लस उत्पादक कंपनी आहे. त्यामुळे संपूर्ण जगाचे लक्ष सीरम इन्स्टिट्यूटच्या उत्पादनाकडे लागले आहे. ग्रेट ब्रिटनमधील आॅक्सफर्ड युनिव्हर्सिटीशी केलेल्या करारांतर्गत विकसित झालेल्या लसीच्या चाचण्याही सीरमतर्फे सुरू झाल्या आहेत. लसींच्या चाचण्या पूर्ण होऊन सन २०२१ च्या जानेवारी-फेब्रुवारीपर्यंत ती प्रत्यक्ष लोकांना उपलब्ध होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भारतीयांना लवकर लस उपलब्ध व्हावी यासाठी केंद्र सरकारकडूनही प्रयत्न सुरू आहेत. या टिष्ट्वटनंतर थोड्या वेळातच केलेल्या दुसऱ्या टिष्ट्वटमध्ये पुनावाला यांनी हा प्रश्न उपस्थित करण्यामागचे कारणही सांगितले आहे. त्यात पुनावाला म्हणतात, ‘‘मी हा प्रश्न विचारला कारण, भारतासह भारताबाहेरील लस उत्पादक कंपन्यांसोबत आपल्या देशाची आवश्यकता व त्यानुसार उत्पादन आणि वितरणाचे नियोजन करावे लागणार आहे.’’गेट्स फाउंडेशनला दहा कोटी डोससीरम इन्स्टिट्यूटने काही दिवसांपूर्वीच बिल अ‍ॅण्ड मेलिंडा गेट्स फाउंडेशन व जीएव्हीआयसोबत करार केला आहे. याअंतर्गत या संस्थेला सुमारे २२५ रुपयांत लसीचा एक डोस उपलब्ध करून दिला जाणार आहे. याअंतर्गत अल्प व मध्यम स्वरूपाची अर्थव्यवस्था असलेल्या सुमारे ९२ देशांना १० कोटी डोस उपलब्ध करून दिले जाणार आहेत.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीcorona virusकोरोना वायरस बातम्याPuneपुणे