शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

पदामुळे निवडणूकीतून बाद असा नियम भाजपात नाही : माधुरी मिसाळ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2019 11:49 IST

मोठे पद आले म्हणून निवडणूक लढवता येणार नाही असा कोणताही नियम नाही..

ठळक मुद्देआमदार माधुरी मिसाळ यांनी पर्वतीमधून दावेदार असल्याचेही केले स्पष्ट : गणेश बीडकरही इच्छुक

पुणे: भारतीय जनता पार्टीच्या पुणे शहराच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून आमदार माधुरी मिसाळ यांनी मंगळवारी सकाळी पक्ष कार्यालयात कार्यभार स्विकारला. मावळते अध्यक्ष योगेश गोगावले यांच्याकडून त्यांनी सुत्रे स्विकारली. पद असले की निवडणूक लढवता येणार नाही असा पक्षात नियम नसल्याचे सांगत त्यांनी आपण पर्वतीमधून दावेदार असल्याचेही स्पष्ट केले.शहर सरचिटणीस म्हणून गणेश बीडकर यांनीही सुत्रे स्विकारला. त्यांनीही आपण कसबा विधानसभा मतदारसंघामधून उमेदवारी देण्याची पक्षाकडे मागणी करणार असल्याचे सांगितले. महापौर मुक्ता टिळक, आमदार भीमराव तापकीर, जगदीश मुळीक, प्रदेश चिटणीस धीरज घाटे, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष मुरली मोहोळ, दीपक मिसाळ, गणेश घोष यावेळी उपस्थित होते.विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षाने शहराची जबाबदारी दिली आहे. विधानसभेच्या शहरातील सर्व जागा सध्या पक्षाकडे आहेत. त्या तशाच राहतील व पूर्वीपेक्षा जास्त मताधिक्य मिळेल या पद्धतीने काम करू असे मिसाळ यांनी सांगितले. मोठे पद आले, मग आता विधानसभा लढवणार का या प्रश्नावर त्यांनी पद आहे म्हणून निवडणूक लढवता येणार नाही असा कोणताही नियम पक्षात नसल्याचे सांगितले. युतीचा निर्णय सर्वस्वी पक्षश्रेष्ठींचा आहे. त्यामुळे याबाबतीत काहीच बोलणार नाही. पक्षाने आदेश दिल्यावर त्याप्रमाणे काम करणार. त्यासाठी सर्वांचे सहकार्य मिळेल, पक्षाची शहरातील ताकद वाढवण्यासाठी सर्वस्वी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. गणेश बीडकर यांनीही गेली २५ पेक्षा जास्त वर्षे शहरात व त्यातही कसब्यात काम करत असल्याचे सांगत विधानसभेसाठी पक्षाकडे तिथूनच मागणी करणार असल्याचे सांगितले.गोगावले म्हणाले, शहराध्यक्ष म्हणून साडेतीन वर्षे काम करता आले. नेतृत्वाने दिलेले सर्व आदेश चोखपणे पार पाडले. सहकाºयांची त्यासाठी फार मदत झाली. त्यांच्याशिवाय काम करता आले नसते. पक्षाचे सक्षम असे संघटन शहरात उभे करता आले, त्याची ताकद काय आहे ते महापालिका, लोकसभा निवडणूकीत दिसून आले. आता प्रदेश स्तरावरही चांगले काम करू असे ते म्हणाले. 

टॅग्स :PuneपुणेBJPभाजपाMadhuri Misalमाधुरी मिसाळElectionनिवडणूक