शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
5
चोरीच्या आरोपाखाली महिलेला दिली थर्ड डिग्री, पोलिसांवर गुन्हा दाखल 
6
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
7
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
8
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
9
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
10
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
11
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
12
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
13
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
14
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
17
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
18
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार

पंडितजींसारखा ‘ गुरू’ नाही...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2019 4:15 PM

दिव्यांग मुलीच्या अप्रतिम सादरीकरणाचा कलाविष्कार..

पुणे :   ‘गुरूजी आपके साथ सवाई गंधर्व महोत्सव मैं कौन कौन आ रहा है? तिने विचारले. ‘क्यूं, तुम आना चाहती हो?  ती म्हणाली, ‘हा’.  गुरूजी म्हटले, तो  ‘चलो’....त्यानंतर तिने स्वरमंचावर नुसती गुरूजींना सहवादनाची साथच दिली नाही तर ‘दर्दी’ रसिकांची वाहवा देखील मिळविली. आपल्या शिष्याला मिळालेली दाद बघून गुरूजींचा उर अभिमानाने भरून आला.

६७ व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाच्या पहिल्या सत्राच्या उत्तरार्धात आंतरराष्ट्रीय ख्यातीचे बासरीवादक पं. हरिप्रसाद चौरसिया यांच्या मैफलीत त्यांना सहवादनाची साथ देणाऱ्या कृतिका जंगीनमठ या दिव्यांग मुलीने तिच्या अप्रतिम सुरावटींमधून सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. चौरसिया यांनी आपल्या या लाडक्या शिष्येला वादनाची संधी देऊन तिच्यात आत्मविश्वास निर्माण केला. रसिकांच्या कौतुकाने ती देखील सुखावून गेली. कृतिकाचा बासरीवादनाचा प्रवास हा काहीसा रंजक असाच आहे. कृतिकाची आई पदमावती विरेश जंगीनमठ यांनी  ‘लोकमत’शी बोलताना तिचा प्रवास शब्दबद्ध केला. त्या म्हणाल्या, कृतिकाला सुरूवातीला दिव्यांग मुलींच्या शाळेत प्रवेश घेतला. तिला  ‘संगीत’ विषय होता. संवादिनीवर शिक्षिका तिला संगीत शिकवायच्या. त्या संवादिनीचे नोटेशन ऐकून ती त्याच भाषेत बोलायची. ती वयाच्या तिसऱ्या वर्षी संवादिनी आणि गाणं दोन्ही शिकली. तिची आजी द्वारकेला प्रवासाला गेली असताना तिने कृतिकासाठी बासरी आणली. गाणी ऐकून ती बासरीवर वाजवायची. शास्त्रोक्त शिक्षण देण्यासाठी विजापूरमधील बासरीवादकांकडे घेऊन गेलो. तिने बासरीचे सूर लवकर आत्मसात केले. तेव्हा ते म्हणाले हिला मुंबईला पं. चौरसिया यांच्याकडे घेऊन जा. आम्ही तिला चौरसिया यांच्या गरूकुलमध्ये घेऊन गेलो. तिला शिकवायला प्रोब्लेम नाही. पण ती दिव्यांग असल्यामुळे तिला आम्हाला गुरूकुल मध्ये ठेवून घेता येणार नाही. मग आम्ही विजापूरला परत आलो. बाजारात पं. हरिप्रसाद चौरसिया यांच्या सर्व सीडीज आम्ही विकत घेतल्या. ती ऐकून ती एकलव्याप्रमाणे शिकली. ठाण्याच्या निलेश पोटे यांच्याकडून आम्ही तिच्यासाठी बासरी तयार करून घेतली. पुण्याच्या चिन्मयनाथ बिंदू यांच्या तीन आठवड्याच्या कार्यशाळेत तिने अभ्यासपूर्ण पद्धतीने ती बासरी वाजवायला शिकली. तीन स्केलची बासरी ती पकडू लागली. तेव्हा ती आठवीमध्ये शिकत होती. आम्ही पं. हरिप्रसाद चौरसिया यांच्याकडे पुन्हा गेलो. तेव्हा मुंबईमध्ये फ्लँट घेऊन राहिलो. हळूहळू ती गुरूजींची लाडकी शिष्य झाली. गुरूजींबरोबर सोलापूरसह इतर ठिकाणी तिने गुरूजींबरोबर वादन केले आहे. मुंबईची  ‘विरासत’ स्पर्धाही ती जिंकली आहे. गुरूजींना ती वादन दूरध्वनीवरून ऐकवते आणि गुरूजी देखील तिचे तासतास ऐकतात. सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवात रसिकांनी तिच्या वादनाला दिलेल्या कौतुकाच्या थापेने आम्ही भरून पावलो. ......’ सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाच्या स्वरमंचावर गुरूंजीबरोबर वादन करणं आणि रसिकांची दाद मिळणं हा खूपच आनंदादायी आणि समृद्ध करणारा अनुभव होता.मी मूळची कर्नाटकमधील विजयपूर (विजापूर) गावची. मी शाळा आणि महाविद्यालयीन सुट्टीच्या काळात मुंबईला गुरूजींकडे जाऊन गुरूकुल पद्धतीने बासरीवादनाचे शिक्षण घेते. ’पंडितजींसारखा गुरू नाही’’- कृतिका जंगीनमठ, दिव्यांग बासरीवादक

टॅग्स :PuneपुणेDivyangदिव्यांगmusicसंगीत