शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

'पीएमपी' ला गणपतीबाप्पाचा ''प्रसाद ''नाहीच  

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2019 07:00 IST

गणेशोत्सवाच्या काळात ' पीएमपी' कडून ६०० जादा बसचे नियोजन करण्यात आले होते.

ठळक मुद्देउत्पन्नात अपेक्षित वाढ नाहीदहा दिवसांत केवळ चार वेळा पीएमपीचे उत्पन्न दीड कोटींच्या गेले पुढे

पुणे : गणेशोत्सवामध्ये गणेशभक्तांना सेवा देण्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) जादा बस सेवा सुरू केली होती. मात्र, या सेवेला प्रवाशांचा अपेक्षित प्रसिताद मिळालेला नाही. या कालावधीत केवळ एकच दिवस पीएमपीला पावणे दोन कोटी रुपयांच्या पुढे दैनंदिन उत्पन्न गाठता आले. दहा दिवसांत केवळ चार वेळा पीएमपीचे उत्पन्न दीड कोटींच्या पुढे गेले. गणेशोत्सवाच्या काळात ' पीएमपी' कडून ६०० जादा बसचे नियोजन करण्यात आले होते. दैनंदिन संचलनातील बस रात्री १० वाजेपर्यंत सोडण्यात आल्या. तर त्यानंतर मध्यरात्री १ वाजेपर्यंत जादा बस यात्रा विशेष म्हणून धावल्या. या बसच्या प्रचलित दरामध्ये पाच रुपयांची जादा दरआकारणी करण्यात आली. तसेच पासची सवलत रात्री १२ वाजेपर्यंत देण्यात आली. पुणे व पिंपरी चिंचवडमधील विविध स्थानकांतून बसचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, यंदा पीएमपी बससेवाला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. ह्यपीएमपीह्णला दैनंदिन उत्पन्न १ कोटी ४० लाख ते दीड कोटीपर्यंत मिळते. गणेशोत्सवातील पहिल्या दिवशी अपेक्षेप्रमाणे मार्गावरील कमी बस तसेच प्रवाशांची संख्या रोडावल्या उत्पन्न १ कोटी रुपयांच्या आत राहिले. तर दुसºया दिवशी हे उत्पन्न १ कोटी ६२ लाखांवर गेले. त्यानंतर पुढील पाच दिवस दीड कोटींचा टप्पाही गाठता आला नाही. अखेरचे तीन दिवस प्रवाशांमध्ये काहीशी वाढ झाल्याचे उत्पन्न मिळालेल्या उत्पन्नावरून दिसते. दि. ९ सप्टेंबर रोजी गणेशोत्सवातील सर्वाधिक १ कोटी ८० लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. त्यानंतरचे दोन दिवस दीड कोटीच्या किंचित पुढे गेले. पण तिकीट दर ५ रुपयांनी वाढवूनही उत्पन्नात अपेक्षित वाढ झालेली दिसत नाही. यंदाच्या गणेशोत्सवात अधूनमधून पावसाच्या सरी बरसत होत्या. तसेच शहराच्या मध्यभागातील रस्ते या काळात  सायंकाळनंतर बंद करण्यात येत होते. तर शिवाजी रस्ता अकरा दिवस बंद ठेवण्यात आला होता. अनेक पुणेकरांनी खासगी वाहनांचा वापर केला. परिणामी जादा बसला प्रवाशांचा अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही, असे अधिकाºयांनी सांगितले.------------------ह्यपीएमपीह्णचे गणेशोत्सवातील दैनंदिन उत्पन्नदिवस               उत्पन्नदि. २         ९५,७०,१२८दि. ३        १,६२,९०,३२०दि. ४        १,४४,८५,७१९दि. ५        १,४६,०५,५१५दि. ६        १,३०,७३,३०४दि. ७        १,५०,०८,८६६दि. ८        १,३८,०५,३७१दि. ९                      १,८०,१९,४४२दि. १०                  १,५४,१३,९९६दि. ११                  १,५६,९९,३२९ 

टॅग्स :PuneपुणेPMPMLपीएमपीएमएलNayana Gundeनयना गुंडेGaneshotsavगणेशोत्सव