शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

वकिली करताना त्यात यशस्वी होण्याचे अचूक असे कुठले सूत्र नाही : कपिल सिब्बल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2020 19:31 IST

यशस्वी वकिल होण्याचे मुळ हे वकीलाच्या आकलन आणि समजुतदारपणा यात आहे...

ठळक मुद्देडॉ. पतंगराव कदम स्मृती व्याख्यान

पुणे : वकिली करताना त्यात यशस्वी होण्याचे अचूक असे कुठले सुत्र नाही. आपला युक्तिवाद न्यायालयाला प्रभावीपणे पटवून देणे यासाठी वकिलाला मानवी भावनाचे विविध पैलु समजावून घेता यायला हवेत. तसे झाल्यास तो  आपल्या पक्षकाराची बाजु तितक्याच संवेदनशीलतेने मांडु शकतो. यशस्वी वकिल होण्याचे मुळ हे वकीलाच्या आकलन आणि समजुतदारपणा यात आहे. याचा अभ्यास व्हायला हवा. असे मत ज्येष्ठ विधिज्ञ व खासदार कपिल सिब्बल यांनी व्यक्त केले.        भारती विद्यापीठ न्यू लॉ कॉलेज येथे शनिवारी डॉ. पतंगराव कदम स्मृती व्याख्यानमालेत प्रसिद्ध वकील व  राज्यसभा सदस्य कपिल सिब्बल हे   ‘वकिली कौशल्य ( अ‍ॅडव्होकसी स्किल्स’ या विषयावर  बोलत होते. यावेळी कॉलेजच्या प्रभारी प्राचार्य डॉ. भाग्यश्री देशपांडे, भारती विद्यापीठाचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम, कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे, कुलसचिव जी. जयकुमार उपस्थित होते. सिब्बल म्हणाले, आपल्या पक्षकाराची न्यायालयात बाजू मांडण्यासाठी जाताना दाव्यांचा बारकाईने अभ्यास करून नेमका वाद काय आहे, हे मांडता आले पाहिजे. कायदेशीर बाजू मांडताना आपण स्वत: आपल्या मुद्द्यांवर ठाम आहोत का हे पाहिले पाहिजे. वकिलीचे क्षेत्र हे एकमेव क्षेत्र आहे जिथे सर्व कायदा या मुद्द्यामुळे समान असतात. कोणीही पदाने, वयाने लहान किंवा मोठा नसतो, त्यामुळे वकिली करताना कोणतीही भिती बाळगू नये. असा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.  तसेच वकिलीच्या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी कोणतेही सूत्र ठरलेले नाही. जसे स्वयंपाक घरात पाककृती करण्यासाठी कोणता पदार्थ किती व कसा वापरायचा याचे पक्के सूत्र ठरलेले नाही, तसे वकिली क्षेत्रालाही हे लागू होते. मात्र वकिली करताना वकिलांना कायदा नेमका काय आहे, त्याची निर्मिती, तो तयार करण्यामागे कोणत्या भावना होत्या हे समजून घेणे आवश्यक आहे. कायदा तोच असला तरी प्रत्येक दाव्यात त्याचे संदर्भ देताना गुन्ह्यामागील मानवी भावना नेमकी काय होते हे वकिलाला मांडता आले पाहिजे, असे सिब्बल यांनी सांगितले. 

टॅग्स :Puneपुणेkapil sibalकपिल सिब्बलadvocateवकिल