शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये झाला मोठा कांड! गावातील हिंदू घराघरातून निघाले मुस्लीम मतदार; गावकरीही झाले हैराण
2
उद्या उपराष्ट्रपती पदाची निवडणूक; संख्याबळ कोणाकडे? कोणाचा कोणाला पाठिंबा? जाणून घ्या...
3
नादखुळा...! उत्तराखंडमध्ये रस्ते बंद होते, चार विद्यार्थी बीएडची परीक्षा देण्यासाठी हेलिकॉप्टरने आले...
4
'भारतावर टॅरिफ लादणे योग्य निर्णय'; झेलेन्स्की यांनी डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या कारवाईचे केले समर्थन
5
अमेरिकेच्या डोळ्यात खुपताहेत भारत-चीन; "जास्त टॅरिफ लावा," आणखी एका अधिकाऱ्यानं गरळ ओकली
6
AIच्या मदतीने सामान्य माणूस बनवू शकतो अणुबॉम्ब! एआयच्या 'गॉडफादर'चा इशारा
7
Pitru Paksha 2025: पितरांच्या नैवेद्याआधी 'हे' पाच घास तुम्ही काढून ठेवता का?
8
वजन कमी करा, पैसे मिळवा! कंपनी देतेय जबरदस्त ऑफर; कर्मचाऱ्यांना वजन कमी केल्यावर लाखो डॉलर्स मिळणार
9
भाजपा खासदाराच्या बहि‍णीला भररस्त्यात दांडक्याने बेदम मारले; Video व्हायरल, नेमका प्रकार काय?
10
बापरे! नवऱ्याशी भांडल्यावर चिडली, गंगेत उडी मारली; मगर दिसताच रात्रभर झाडावर बसली अन्...
11
"मी विद्या बालनला फोन केला...", सुचित्रा बांदेकरांना आलेला रिजेक्शनचा अनुभव, सांगितला किस्सा
12
VIRAL :  बुर्ज खलिफाच्या मागून डोकावला 'ब्लड मून'; अविस्मरणीय क्षण तुम्ही पाहिलात का?
13
पितृपक्ष २०२५: पितरांना नैवेद्य दाखवल्यावर आवर्जून म्हणा 'हे' स्तोत्र; अन्यथा अपूर्ण राहील श्राद्ध विधी!
14
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये जवानांच्या चकमकीत दहशतवाद्याचा खात्मा, पाकिस्तानी घुसखोरही अटकेत
15
Pitru Paksha: पितरांचे आत्मे घरी येणार असतील तर ते अशुभ कसे?
16
लिंगायत समाजाला हिंदू धर्माचा भाग मानू नका, कर्नाटकात जात सर्वेक्षणापूर्वी मोठी मागणी
17
PF खातेधारकांसाठी मोठी बातमी! आता एटीएम-UPI ने काढता येणार पैसे, लवकरच 'EPFO 3.0' येणार
18
Pitru Paksha 2025: पितृ ऋण कशाला म्हणतात, पितृ पक्षात ते का फेडायचे आणि त्यामुळे कोणते लाभ होतात? वाचा!
19
Online Food: Zomato नंतर Swiggy वरुनही ऑनलाइन जेवण मागवणं पडेल महागात, जीएसटीचाही परिणाम दिसणार
20
"डीजेमुळे वादनच झालं नाही", पुण्यातील विसर्जन मिरवणुकीत आला अत्यंत वाईट अनुभव, सौरभ गोखले म्हणाला...

ऐतिहासिक चित्रपटांची आवड निर्माण करण्याची गरज

By admin | Updated: February 19, 2015 01:20 IST

आजच्या काळात थिल्लर चित्रपटांना तरुणाईची गर्दी होते; पण ऐतिहासिक चित्रपटांकडे पाठ फिरवली जाते, ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे.

पुणे : आजच्या काळात थिल्लर चित्रपटांना तरुणाईची गर्दी होते; पण ऐतिहासिक चित्रपटांकडे पाठ फिरवली जाते, ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे. ऐतिहासिक चित्रपट पाहण्याची आवड निर्माण करण्याचे काम झाले पाहिजे, असे मत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी बुधवारी व्यक्त केले. ‘अक्षरधारा बुक गॅलरी’च्या वतीने छ्त्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त गो. नी. दांडेकर लिखित ‘शिवकाल’ या कादंबरीतील शिवराज्याभिषेकावरील ‘हे तो श्रींची इच्छा’ याच्या अभिवाचनाचा विक्रमी ६५0 वा प्रयोग नवी पेठेतील निवारा वृद्धाश्रमाच्या सभागृहात पार पडला. त्या वेळी ते बोलत होते. याप्रसंगी प्रा. मिलिंद जोशी, गो. नी. दांडेकर यांची कन्या डॉ. वीणा देव, डॉ. विजय देव उपस्थित होते. बाबासाहेब पुरंदरे म्हणाले, की प्रवचन, कीर्तन, अभिवाचन ही वक्तृत्वाची प्रभावी माध्यमं आहेत. मात्र नव्या पिढीचा समज असा आहे, की प्रवचन म्हणजे बसून बोलणे आणि कीर्तन म्हणजे उभे राहून संवाद साधणे. पण सप्ताह, कीर्तन, प्रवचन यांमधून वक्तृत्वाचा आविष्कार साकारत गेला. आज माध्यमं भरपूर आहेत; पण त्याचा खरा कितपत उपयोग केला जातो, हाच मुळात प्रश्न असल्याचे त्यांनी सांगितले. ‘‘विजयनगरचे साम्राज्य बुडाल्यानंतर शिवरायांचा राज्याभिषेक झाला होता. त्यामुळे स्वातंत्र्याची चळवळ शिवरायांपासून झाली. पाश्चात्यांची आक्रमणे होत गेली, स्वातंत्र्याभिमान विरला. पण हिंदवी स्वराज्याच्या सामर्थ्यातून तो अभिमान पुन्हा जागृत झाल्याचे डॉ. विजय देव यांनी सांगितले. या वेळी डॉ. वीणा देव, डॉ. विजय देव, रुचिर कुलकर्णी आणि विराजस कुलकर्णी यांनी सादर केलेल्या शिवराज्याभिषेकावरील अभिवाचनातून शिवकालाचे एकेक पर्व उलगडत गेले. संवादाची पकड... त्यातील चढउतार... यातून प्रत्येक पात्र त्यांनी रसिकांसमोर उभे केले. गागाभट्ट आणि शिवरायांमधील संवाद... शिवराज्याभिषेकामागची पार्श्वभूमी... या गोष्टींंमधून शिवकाल उपस्थितांनी अनुभवला. (प्रतिनिधी)शिवरायांच्या जन्मापासून शेवटच्या घटकापर्यंत अशा पाच खंडांत मिळून ही एक कादंबरी साकार झाली आहे. ’शिवराय’ नव्हे तर ’काळ’ हा या कादंबरीचा गाभा आहे. शिवरायांच्या काळात राज्याभिषेक हा कळससाध्य होता. - डॉ. वीणा देव