शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
3
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
4
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
5
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
6
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
7
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
8
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
9
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
10
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
11
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
12
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
13
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
14
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
15
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
16
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
17
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान
18
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
19
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
20
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी

ना हरकत नसल्याने घोडगंगाला कर्ज मिळण्यात अडचणी; अजित पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2024 13:42 IST

न्हावरे : घोडगंगा सहकारी साखर कारखान्याला ज्या बँकांनी कर्ज दिले. त्यांच्याकडून ना हरकत प्रमाणपत्र कारखाना प्रशासनाने घेतले नाही, तसेच ...

न्हावरे : घोडगंगा सहकारी साखर कारखान्याला ज्या बँकांनी कर्ज दिले. त्यांच्याकडून ना हरकत प्रमाणपत्र कारखाना प्रशासनाने घेतले नाही, तसेच कारखान्याचे भागभांडवल कमी आहे. कर्जशक्ती कमी असल्यामुळे घोडगंगाचा एनसीडीसीचा कर्ज प्रस्ताव मान्य केला जात नाही. ही खरी वस्तुस्थिती आहे. केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांच्या माध्यमातून घोडगंगाचे एनसीडीसीचे कर्ज मंजूर करून हा कारखाना सुरू करणारच, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ठणकावून सांगितले.न्हावरे (ता. शिरूर) येथे महायुतीचे उमेदवार ज्ञानेश्वर ऊर्फ माऊली कटके यांच्या प्रचारार्थ आयोजित प्रचारसभेत उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते. यावेळी महायुतीचे उमेदवार ज्ञानेश्वर कटके, माजी खासदार शिवाजीराव आढळराव, प्रदीप गारटकर, प्रदीप कंद, राहुल पाचर्णे निवृत्ती अण्णा गवारी सुरेश घुले, दिलीप वाल्हेकर, स्वप्नील ढमढेरे, स्वप्नील गायकवाड, मोनिका हारगुडे, वैशाली नागवडे जाकीरखान पठाण, अनिल काशीद, शशिकांत दसगुडे, राजेंद्र जासूद, राजेंद्र जगदाळे, आबा सोनवणे, जितेंद्र बढेकर, चंदन सोंडेकर उपस्थित होते.अजित पवार म्हणाले, विरोधी उमेदवार घोडगंगा कारखान्याच्या संदर्भात मला विनाकारण टार्गेट करून बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत; पण मतदारसंघातील जनतेने खरी वस्तुस्थिती समजून घेतली पाहिजे. घोडगंगा सहकारी साखर कारखान्याची २०२४ ची आर्थिक स्थिती पाहता घोडगंगा कारखान्यावर २९० कोटी रुपये देणे आहे. ६४ कोटी रुपयांचा तोटा आहे. ८४ कोटी रुपये राज्य सहकारी बँकेचा एनपीए २०२३ मध्ये झाला आहे. त्यामुळे आजीमाजी संचालकांना जप्तीच्या नोटिसा निघाल्या आहेत. बँक ऑफ बडोदामध्ये ९ कोटी रुपये दिलेले कर्ज पूर्णतः थकबाकीत गेल्यामुळे बँकेने जप्तीची नोटीस काढलेली आहे. बँक ऑफ इंडिया न्हावरे शाखेची ३० कोटी रुपयांची अनेक वर्षांची थकबाकी आहे. घोडगंगा कारखान्याच्या कामगारांचे पगार व इतर देणी ३५ कोटी रुपयांची आहेत. त्यामुळे कारखान्याचे कर्मचारी संपावर गेले. दरम्यान घोडगंगाच्या कर्मचाऱ्यांवर घेतलेले कर्ज एनपीए झालेले आहे. दरम्यान त्या बिचाऱ्या कामगारांना १०१ नोटिसा आल्या आहेत. वरील सर्व बाबी पाहता बँकांनी ना हरकत प्रमाणपत्र न दिल्यामुळे व कारखान्याचे भागभांडवल कमी असल्याने एनसीडीसीचा कर्ज प्रस्ताव मान्य केला जात नसल्याचे त्यांनी सांगितले.ज्ञानेश्वर कटके म्हणाले की, शिरूर हवेलीच्या विकासासाठी मी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रमाणिक प्रयत्न करीन. वेळत व नियोजनबद्ध चासकमान घोडचे आवर्तन सोडण्यासाठी माझे पहिले प्रधान्य असेल, तसेच घोडगंगा सुरू करण्यासाठी प्रमाणिक प्रयत्न करीन.रडीचा डाव खेळू नकाचासकमान प्रकल्पाच्या कालव्याच्या अस्तरीकरणासाठी १९९५.९५ कोटी रुपयांची सुधारित प्रशासकीय मान्यता दिलेली आहे. त्यामुळे चासकमानचे पाणी सर्व शेतकऱ्यांना मिळणार आहे. चासकमानचे वेळेवर नियमित आवर्तन देण्याची जबाबदारी माझी आहे. त्यामुळे विरोधकांच्या भूलथापांना कोणीही थारा देऊ नका. घोडगंगाचे अध्यक्ष ऋषिराज पवार अपहरण व मारहाण प्रकरणातील आरोपीने मी हे स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी केले आहे. त्यात कोणाचाही दुरान्वये संबंध नाही. असे पोलिस तपासादरम्यान सांगितले आहे. तसे तपासात सिद्ध झाले आहे. मात्र, निवडणूक काळात भावनिक मुद्दा करून विरोधी उमेदवारांकडून सहानुभूती मिळविण्याचा केविलवाणा प्रयत्न केला जात होता. निवडणुका खुल्या वातावरणात खेळीमेळीच्या वातावरणात करायच्या असतात रडीचा डाव खेळू नका, असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदार अशोक पवार यांना यावेळी लगावला.

टॅग्स :Puneपुणेmaharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024Ajit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवार