शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
2
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
3
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
4
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
5
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
6
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
7
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
8
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
9
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
10
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
11
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
12
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
13
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
14
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
15
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
16
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा
17
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
18
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!
19
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
20
'सरकारने निर्दोषांना शिक्षा करू नये; पण...', दिल्ली बॉम्बस्फोटांवर अबू आझमींचे मोठे विधान

देशात करीश्मा असणारे नेतृत्व नरेंद्र मोदींशिवाय कोणी नाही; अजित पवारांची स्तुतीसुमने

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2023 22:41 IST

'काहीजण त्यांच्यावर टीका करतात, त्यांनी मोदींएवढे काम करणारा नेता आहे का, याचा विचार करावा.'

बारामतीकेवळ विकासाचा दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवुन महायुतीसमवेत जाण्याचा निर्णय घेतला.यामध्ये अपमान करण्याच भुमिका नाहि.देशात करीश्मा असणारे नेतृत्व नरेंद्र मोदींशिवाय कोणी नाहि.हि वस्तुस्थिती  मान्य केली पाहिजे. काहीजण त्यांच्यावर टीका करतात,त्यांनी मोदींएवढे काम करणारा नेता आहे का,याचा विचार करावा,अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर स्तुतीसुमने उधळली.

बारामतीकरांच्या वतीने पवार यांचा शारदा प्रांगणात नागरी सत्कार करण्यात आला.यावेळी पवार बोलत होते.उपमुख्यमंत्री पवार पुढे म्हणाले,चांद्रयान मोहिमेच्या यशामुळे जगाचा भारताकडे बघण्याचा दृष्टीकोन बदललाल आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदींनी   भारताची अर्थव्यवस्था जागतिक पातळीवर पाचव्या क्रमांकावर आणली आहे. नरेंद्र मोदींच्या यांना ती तिसºया क्रमांकावर म्हणजे ५ ट्रीलीयन डॉलरवर न्यायची आहे.त्यांच्याऐवढे काम करणारा नेता कोणीहि नाहि.एकनाथ शिंदे,फडवणवीस आणि आम्ही महाराष्ट्राची अर्थव्यवस्था १ ट्रीलीयन डॉलरवर नेणार आहोत.अर्थव्यवस्थेची जबाबदारी घेतली आहे.त्यासाठी आपण महत्वाचे नियोजन करणार आहे.राज्यातील कृषि,उद्योग,आयटी क्षेत्रावर भर देण्याचे नियोजन आहे.वर्षभरातील प्रकल्प मार्गी लावण्याचा प्रयत्न सुरु आहे.

आजपर्यंतच्या सर्व पंतप्रधानांनी उत्तम काम केले.मोदी यांच्या नेतृत्वाखाली जगात भारताने विकास मुद्रा उमटविली.त्याचा प्रत्येक भारतीयांना अभिमान आहे.यापुर्वी आपण त्यांच्यावर विरोधात  टीका केल्याचे मान्य करतो.मात्र,नंतरच्या काळात कसे काम होणार याबाबत आपल्यास माहिती नव्हते.बारामतीसह आसपासच्या सुरु असणाºया महामार्गाच्या कामावरुनच आपल्याला केंद्र सरकारच्या कामाची कल्पना येते.केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी राज्यातील साखर कारखान्यांचा २० वर्षांंपासुन प्रलंबित असलेला ११ हजार ५०० कोटींचा प्रश्न मार्गी लावला.ती शेतकºयांवर कायम टांगती  तलवार होती,असे सांगत पवार यांनी शहा यांचे देखील कौतुक केले.

बारामतीकरांनो कोणाचा अपमान करण्याची भुमिका नाहि.महायुतीबरोबर गेल्यानंतर आपण  पुणे नगर नाशिक रेल्वेच्या कामाला गती देण्यासाठी प्रयत्न करणार आहे.त्यासाठी वेळप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी,केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना भेट घेणार आहे.पुणे जिल्ह्यातील विमानतळाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी,पुणे शहरातील मेट्रोसह अन्य विषय मार्गी लावण्यासाठी  प्रयत्न करणार असल्याचे पवार म्हणाले.

प्रास्तविक राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष जय पाटील,तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांनी केले.कार्यक्रमास सुनेत्रा पवार,पार्थ पवार,राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर,जिल्हा बँक चेअरमन दिगंबर दुर्गाडे, बारामती बँक चेअरमन सचिन सातव,छत्रपती कारखाना अध्यक्ष प्रशांत काटे,बाजार समिती सभापती सुनील पवार,बारामती दुध संघाचे चेअरमन पोपटराव गावडे,सोमेश्वरचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप,विश्वास देवकाते,माळेगांवचे अध्यक्ष बाळासाहेब तावरे,योगेश जगताप,महिला शहर अध्यक्षा अनिता गायकवाड,तालुकाध्यक्षा वनिता बनकर आदी उपस्थित होते.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारBaramatiबारामतीNarendra Modiनरेंद्र मोदीNCPराष्ट्रवादी काँग्रेस