शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

पुणे जिल्ह्यातील इंग्रजी माध्यमाच्या शाळांना दोन वर्षांपासून प्रवेशशुल्क परतावा नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2020 20:49 IST

यावर्षीपासून मोफत प्रवेशप्रकियेवर बहिष्कार टाकण्याचा दिला संस्थाचालकांनी इशारा

ठळक मुद्देदुर्बल व वंचित घटकांतील मुलांना आरटीईअंतर्गत २५ टक्के जागांवर मोफत प्रवेशाची योजनाशाळांना प्रतिपूर्ती शुल्काबाबत एका वर्षाच्या आत परतावा देणे बंधनकारक

बारामती : जिल्ह्यातील इंग्रजी माध्यमाच्या शाळांना मागील दोन वर्षांपासून शिक्षण हक्क कायद्यानुसार दिलेल्या प्रवेशशुल्काचा परतावा मिळालेला नाही. या अंतर्गत शाळांची कोट्यवधी रुपयांची रक्कम शासनाकडे थकीत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे या शाळा अडचणी आल्या आहेत. या महिन्यात मागील शुल्काचा परतावा न मिळाल्यास यावर्षीपासून मोफत प्रवेशप्रकियेवर बहिष्कार टाकण्याचा इशारा संस्थाचालकांनी दिला आहे.महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशनचे (मेस्टा) जिल्हाध्यक्ष सतीश सांगळे व उपाध्यक्ष दत्तात्रेय माळशिकारे यांनी हा इशरा दिला आहे. जिल्ह्यात शिक्षण हक्क कायद्यानुसार मोफत प्रवेशाची प्रक्रिया राबविण्यात येते. कोऱ्हाळे (ता. बारामती) येथे जिल्ह्यातील संस्थाचालकांची बैठक घेण्यात आली, त्या वेळी संस्थाचालकांनी हा निर्णय घेतला. दुर्बल व वंचित घटकांतील मुलांना आरटीईअंतर्गत २५ टक्के जागांवर मोफत प्रवेशाची योजना आहे. यात शाळांना प्रतिपूर्ती शुल्काबाबत एका वर्षाच्या आत परतावा देणे बंधनकारक आहे. मात्र, शासनाकडून २०१७-१८ ची ५० टक्के रक्कम बाकी आहे. १८-१९ची संपूर्ण रक्कम बाकी आहे. १९-२०ची माहिती मागवली जात नाही. त्यामुळे जिल्ह्यातील संस्थाचालक अडचणीत आले आहेत. शाळांनी प्रवेशप्रकियेत नेहमीच सहकार्यांची भूमिका घेतली. मात्र, शासनाकडे पाठपुरावा करूनही प्रस्ताव प्रलंबित ठेवले जात आहेत. त्यामुळे ३१ जानेवारीपर्यंत प्रलंबित कार्यवाही न झाल्यास संस्थापक-अध्यक्ष संजयराव तायडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील एकही संस्थाचालक २०-२१ची प्रवेशप्रकिया राबविणार नाही, असा इशारा या बैठकीत देण्यात आला.या वेळी जिल्हा सरचिटणीस वैभव जगताप, जिल्हा कोषाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पोमणे, पुरंदर तालुकाध्यक्ष बाळासाहेब झगडे, बारामती तालुकाध्यक्ष राहुल बनकर, उपाध्यक्ष नितीन जाधव, दौड तालुकाध्यक्ष मच्छिंद्र कदम व जिल्ह्यातील संस्थाचालक उपस्थित होते. .........आमच्याकडे पुरेशा प्रमाणात शुल्क परतावा निधी आलेला नाही. उपलब्ध निधीचे वितरण २० जानेवारीपर्यंतच होईल. मात्र, शासन स्तरावरून निधी प्राप्त होताच तत्काळ शुल्कप्रतिपूर्ती  देण्यात येईल.- के. डी. भुजबळ,  उपशिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद, पुणे 

टॅग्स :PuneपुणेSchoolशाळाenglishइंग्रजीGovernmentसरकार