शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणूक: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
2
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
3
मुलांसाठी जबरदस्त आहे 'ही' स्कीम, अनेक योजना याच्यासमोर फेल; रोज फक्त ₹८.५ रुपये वाचवून व्हाल लखपती
4
Rahul Gandhi: 'मतचोरी'च्या आरोपांत नवा ट्विस्ट! 'तो' फोटो ब्राझिलियन मॉडेलचा नाही? तर...
5
भाजपा टू भाजपा व्हाया मनसे...! महापालिका निवडणुकीपूर्वी माजी आमदार तृप्ती सावंत यांची घरवापसी
6
डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल ३,००० कोटी रुपयांची फसवणूक! 'हे' लोक ठरत आहेत सायबर फ्रॉडचे बळी
7
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
8
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
9
गर्भवती पत्नीच्या मृत्यूनं बसला धक्का; १२ तासांनी पतीनेही सोडला जीव; एकाचवेळी २ तिरडी निघणार
10
Cristiano Ronaldo: "मला माझ्या कुटुंबाला, मुलांना वेळ द्यायचा आहे" रोनाल्डो निवृत्तीच्या वाटेवर!
11
VIRAL : लग्नाच्या अगदी आधी वराची 'डिमांड लिस्ट' वाचून सासरे रडले! असं काय लिहिलं होतं?
12
लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का?
13
“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
14
'बिग बॉस १९'च्या विजेत्याचं नाव लीक! रनर-अप आणि टॉप ५ची यादीही आली समोर
15
आनंद महिंद्रा RBL बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; अवघ्या २ वर्षात कसा कमावला २७४ कोटींचा नफा
16
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
17
हेअर फॉलला करा गुड बाय; लांब, काळ्याभोर केसांसाठी 'या' सोप्या सवयी, होईल मोठा फायदा
18
Vastu Shastra: मनी प्लांट चुकीच्या दिशेला ठेवाल, तर आयुष्यभर पश्चात्ताप कराल; पाहा योग्य दिशा!
19
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
20
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का

...तर २ कोटी रुपये द्यावे लागतील; खंडणी उकळणार्‍या माहिती अधिकार कार्यकत्याला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2022 19:21 IST

माहिती अधिकाराखाली माहिती घेऊन कोर्टात दावा दाखल करु अशी धमकीही दिली

पुणे : अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील आढळगाव येथे चालू असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी उत्खननाच्या परवानग्या घेतल्या का, रॉयल्टी भरली का, अशी विचार करुन कंपनीला दंडात्मक कारवाई करायची नसेल. तर २ कोटी रुपये द्यावे लागतील, नाही तर माहिती अधिकाराखाली माहिती घेऊन कोर्टात दावा दाखल करु. अशी धमकी देणार्‍या माहिती अधिकार कार्यकत्याला खंडणी विरोधी पथकाने सापळा रचून पकडले.     दत्तात्रय गुलाब राव फाळके (वय ४६, रा. मानसिंग रेसिडेन्सी, तळजाई पठार, धनकवडी) असे त्याचे नाव आहे. याप्रकरणी यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दत्तात्रय फाळके हा माहिती अधिकार कार्यकर्ता म्हणून काम करतो. त्याने फिर्यादी यांना वारंवार फोन करुन फिर्यादीच्या कंपनीचे राष्ट्रीय महामार्गाचे कामाबाबत उत्खनन करता त्याच्या परवानग्या घेतल्या का, रॉयल्टी पेमेंट केले का अशी विचारणा करुन तुमच्या कंपनीला दंडात्मक कारवाई करायची नसेल. व्यवस्थित काम करायचे असले तर तुम्हाला २ कोटी रुपये द्यावे लागतील. नाही तर तुमच्या हायवेचे कामकाजाबाबत माहिती अधिकाराखाली माहिती घेऊन कोर्टात दावा दाखल करु. तुम्हाला त्रास देणार, तुम्हाला ही जिवंत सोडणार नाही, अशी धमकी देऊन २ कोटी रुपयांची खंडणी मागितली. फिर्यादी यांनी याची तक्रार खंडणी विरोधी पथकाकडे केली. पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वारगेटकडून कात्रजकडे जाणार्‍या सातारा रोडवरील कात्रज येथील कदम प्लाझा येथे सापळा रचण्यात आला. वर २ हजार रुपयांची नोट ठेवून बाकी १२४६ डमी नोटांचे २ बंडल तयार करण्यात आले. २५ लाख रुपयांची बंडल देण्यासाठी तयार केले गेले. मंगळवारी दुपारी पावणेचार वाजता दत्तात्रय फाळके हा ही २५ लाखांची खंडणी घेण्यासाठी तेथे आला असताना पोलिसांनी त्याला पकडले. सहायक पोलीस निरीक्षक सजगणे तपास करीत आहेत.

टॅग्स :PuneपुणेMONEYपैसाPoliceपोलिसArrestअटक