शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

‘तरुणाई’ असेल यंदाच्या ‘पिफ’ची थीम; आॅनलाईन नोंदणीला सुरूवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2017 17:24 IST

'पुणे फिल्म फाउंडेशन' आणि महाराष्ट्र शासनाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केल्या जाणाऱ्या 'पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा'ची (पिफ) रसिक नोंदणी प्रकिया सुरू झाली आहे.

ठळक मुद्दे११ ते १८ जानेवारी, २०१८ दरम्यान होणार यंदाचा 'पिफ' महोत्सव संकेतस्थळावर जाऊन इच्छुकांना करता येणार आॅनलाईन नोंदणी

पुणे : 'पुणे फिल्म फाउंडेशन' आणि महाराष्ट्र शासनाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केल्या जाणाऱ्या 'पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा'ची (पिफ) रसिक नोंदणी प्रकिया सुरू झाली आहे. यंदाचा 'पिफ' महोत्सव ११ ते १८ जानेवारी, २०१८ दरम्यान होणार असून 'तरुणाई' ही महोत्सवाची प्रमुख 'थीम' असणार आहे. प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या आणि दरवर्षी चित्रपटप्रेमींना प्रतीक्षा असलेल्या या महोत्सवाचे हे १६वे वर्ष आहे. या महोत्सवात सहभागी होण्यासाठी नोंदणी प्रक्रियेची माहिती www.piffindia.com या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली असून आज (सोमवार, दि. ११ डिसेंबर)पासून ही नोंदणी प्रक्रिया सुरु करण्यात येत आहे.संकेतस्थळावर जाऊन इच्छुकांना आॅनलाईन नोंदणी करता येणार आहे. संकेतस्थळावर नोंदणी झाल्यानंतर मिळालेल्या नोंदणी क्रमांकासह त्यांना सिटी प्राईड-कोथरूड, सिटी प्राईड- सातारा रस्ता किंवा मंगला चित्रपटगृह यांपैकी कोठेही जाऊन 'स्पॉट रजिस्ट्रेशन' करावे लागणार आहे. पिंपरी-चिंचवडमध्येही स्पॉट रजिस्ट्रेशनची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. हे 'स्पॉट रजिस्ट्रेशन' २० डिसेंबरपासून वर सांगितलेल्या ठिकाणी सकाळी ११ ते सायंकाळी ७.३० वाजेपर्यंत करता येणार आहे.विद्यार्थी, 'फिल्म क्लब'चे सभासद व ज्येष्ठ नागरिक (६० वर्षांपुढील) यांना ओळखपत्र दाखवून रुपये ६०० मध्ये नोंदणी करता येणार आहे, तर इतर इच्छुकांसाठी नोंदणी शुल्क रुपये ८०० इतके आहे.दरवर्षी प्रमाणे या वर्षीही पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये ५ ठिकाणी तब्बल १० स्क्रीन्सवर  महोत्सवातील चित्रपट रसिकांना पाहता येणार आहेत. सिटी प्राईड- कोथरूड हे महोत्सवाचे मुख्य स्थळ असून त्याबरोबरच पुण्यात सिटी प्राईड-सातारा रस्ता, मंगला मल्टीप्लेक्स, राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय (एनएफएआय) या चित्रपटगृहांमध्ये चित्रपट दाखवले जाणार आहेत.

टॅग्स :Puneपुणेonlineऑनलाइन