‘त्यांच्या’ नशिबी जीवघेणा प्रवास झाला रोजचाच
By Admin | Updated: October 15, 2016 05:56 IST2016-10-15T05:56:04+5:302016-10-15T05:56:04+5:30
एकीकडे डिजिटल शिक्षणासाठी प्रसार, प्रचार जोरात चालू आहे, तर दुसरीकडे ग्रामीण भागातील विशेषत: आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना

‘त्यांच्या’ नशिबी जीवघेणा प्रवास झाला रोजचाच
डेहणे : एकीकडे डिजिटल शिक्षणासाठी प्रसार, प्रचार जोरात चालू आहे, तर दुसरीकडे ग्रामीण भागातील विशेषत: आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना आणि नागरिकांसाठी पायाभूत सुविधा मिळणे, समस्या सुटण्यास मुहूर्त लागत नाही. स्वातंत्र्य मिळून ६७ वर्षे झाली तरीही या आदिवासी समाजाचे प्रश्न प्रलंबितच आहेत.
आदिवासी भागातील विद्यार्थ्यांची शिक्षणासाठी पायपीट सुरूच आहे. पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील धामणगावचे विद्यार्थी शिक्षणासाठी धरणाच्या पाण्यातून रोजच जीवघेणा प्रवास करत आहेत.
मागील १५ वर्षांपासून ग्रामस्थ साकव पुलाची मागणी करत आहेत, मात्र अद्यापही त्यांच्या या मागणीकडे राज्यकर्ते, प्रशासनातील अधिकाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष दिले नाही. हे विद्यार्थी धामणगावहून शिक्षणासाठी डेहणे (ता. खेड) येथील महाविद्यालयात अत्यंत धोकादायक पद्धतीने प्रवास करून येतात. भीमा नदीच्या पलीकडे असणाऱ्या गावांना धरणाचे विस्तीर्ण पात्र होडीनेच पार करावे लागत आहे. कायम धरणात पाणी असल्याने फक्त उन्हाळ्यात एखादा महिना सोडल्यास बाकी हा जीवघेणा प्रवास आता रोजचा झाला आहे. एकलहरे, धामणगावचे ग्रामस्थ या चासकमान धरणामुळे विस्थापितांचे जीवन जगत आहेत. दळणवळणासाठी पलीकडे जाण्याचा जवळचा मार्ग नसल्याने होडीचा वापर करतात.