राहूबेट परिसरात ट्रान्सफाॅर्मरमधील तारा, ऑइलच्या चोऱ्या वाढल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:15 IST2021-09-05T04:15:37+5:302021-09-05T04:15:37+5:30
राहू (ता. दौंड) नजीक असलेल्या चव्हाणवाडी नजीकचे दोन ट्रान्सफाॅर्मर चोरट्यांनी खाली पाडून फार मोठ्या प्रमाणात नुकसान करत त्यातील तांब्याच्या ...

राहूबेट परिसरात ट्रान्सफाॅर्मरमधील तारा, ऑइलच्या चोऱ्या वाढल्या
राहू (ता. दौंड) नजीक असलेल्या चव्हाणवाडी नजीकचे दोन ट्रान्सफाॅर्मर चोरट्यांनी खाली पाडून फार मोठ्या प्रमाणात नुकसान करत त्यातील तांब्याच्या तारा व ऑइल चोरुन नेले आहे. विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे परिसरातील शेतीचा व जनावरांसाठी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. ट्रान्सफाॅर्मर चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून भुरट्या चोरट्यांची टोळी परिसरात सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे. ट्रान्सफाॅर्मर चोरीच्या घटनेबरोबरच परिसरात विद्युत मोटारी, केबल देखील मोठ्या प्रमाणावर चोरून नेल्या जात असून समस्येवर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी राहूचे माजी उपसरपंच गणेश चव्हाण यांनी केली आहे.
............. ..................................................... .........................................