शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

...म्हणून उच्चशिक्षित तरुण करायचा दुचाकी चोऱ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2019 14:54 IST

नोकरी गमवावी लागल्याने दुचाकी चोरी करणारा तरुण गजाआड करण्यात खडक पोलिसांना यश आले आहे. आश्चर्य म्हणजे ही चोरी समोर येऊ नये म्हणून तो त्यातील सुट्ट्या भागांची विक्री करत असे

पुणे : नोकरी गमवावी लागल्याने दुचाकी चोरी करणारा तरुण गजाआड करण्यात खडक पोलिसांना यश आले आहे. आश्चर्य म्हणजे ही चोरी समोर येऊ नये म्हणून तो त्यातील सुट्ट्या भागांची विक्री करत असे. शहरातील नाना पेठ भागात अशाच सुट्या भागांची विक्री  तयारीत असताना तो पकडला गेला.               या संदर्भात पोलिसांनी गौरव राजकुमार शर्मा (वय ३०, रा. राजमाता कॉलनी, चोरडिया फार्म, कोंढवा खुर्द, मूळ  रा. उत्तर प्रदेश) याला अटक केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, हॉटेल व्यवस्थापन शास्त्र अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर एका हॉटेलमध्ये व्यवस्थापकपदी असलेल्या गौरवला नोकरी गमवावी लागली. त्यातून निर्माण झालेली आर्थिक अडचण मिटवण्यासाठी त्याने रस्त्याच्या कडेला उभ्या असणाऱ्या दुचाकी वाहन चोरायचा. पण थेट वाहन विकले तर संशय निर्माण होईल म्हणून चोरलेल्या दुचाकी वाहनांची मोडतोड त्यांची विक्री करत असे. वाहने चोरताना तो बनावट किल्लीचा वापर करत असे.             या प्रकरणात एक व्यक्ती चोरलेल्या गाडीचे पार्ट विकायला नाना पेठेत येणार असल्याची खबर खडक पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार फहीम सय्यद आणि आशिष चव्हाण यांना मिळाली. त्यानुसार सापळा रचून गौरवला अटक करण्यात आली. पोलिसांनी केलेल्या चौकशीत त्याने शहराच्या मध्य भागातून २ दुचाकी, वानवडी भागातून २ दुचाकी, भोसरी, पौड भागातून बनावट चावीचा वापर करून दुचाकी लांबविल्याची कबुली दिली.            परिमंडल एकचे पोलीस उपायुक्त सुहास बावचे यांच्या मार्गदर्शनाखाली खडक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र मोकाशी, गुन्हे शाखेचे निरीक्षक उत्तम चक्रे, तसेच उमाजी राठोड, विठ्ठल पाटील, विनोद जाधव, गौरी राजगुरू आदींनी ही कारवाई केली. शर्मा विवाहित असून कर्जबाजारी झाल्याने दुचाकी चोरीचे गुन्हे केल्याची माहिती त्याने दिली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसtheftचोरी