शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

इंदापूरला पुन्हा फोडली दुकाने 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 15:32 IST

दुकानांचे शटर उचकटून अनुक्रमे ४ हजार ८०० रुपये व १ हजार ४० रुपये अशी एकूण  २७ हजार ४८० रुपयांची रोकड चोरी करण्यात आली आहे.

ठळक मुद्देअज्ञात चोरट्याविरुध्द आज (दि.१४) इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

इंदापूर  : इंदापूर-अकलूज रस्त्यालगत शिवाजीनगर भागात मेडिकल स्टोअर्स,पशुखाद्य व शेती साहित्य विक्रीची दुकानांचे शटर उचकटून त्यामधील २७ हजार ४८० रुपयांची रोकड लांबवल्याच्या आरोपावरुन अज्ञात चोरट्याविरुध्द आज (दि.१४) इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.    या संदर्भात मधुकर ज्ञानेश्वर पाटील (रा.अंबिकानगर,इंदापूर) यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. सविस्तर वृत्त असे की,फिर्यादी पाटील हे इंदापूर अकलूज रस्त्यालगत शिवाजीनगर भागात राजर्षी शाहू महाराज मेडिकल व जनरल स्टोअर्स चालवतात. त्यांच्या जवळ बाबासाहेब सूर्यभान खांडेकर यांचे पशु खाद्य विक्रीचे व विजय किसन शिंदे यांचे शेती साहित्य विक्रीची दुकाने आहेत.रविवारी रात्री नऊ वाजता हे सर्वजण आपली दुकाने बंद करुन घरी गेले. सोमवारी सकाळी साडेसहा वाजता फिर्यादी पाटील हे मेडिकल स्टोअर्स उघडण्यासाठी गेले असता, त्याचे शटर उचकटल्याचे त्यांना दिसले. पाहणी केल्यानंतर मेडिकल स्टोअर्समधील बावीस हजार रुपये चोरीस गेल्याचे निष्पन्न झाले. त्याच पध्दतीने खांडेकर व शिंदे यांच्या दुकानांचे शटर उचकाटून अनुक्रमे ४ हजार ८०० रुपये व १ हजार ४० रुपये अशी एकूण  २७ हजार ४८० रुपयांची रोकड चोरीस गेल्याचे दिसून आले. त्यावरुन अज्ञात चोरट्यांनी अज्ञात हत्यारांनी दुकानांचे शटर उचकटून आत प्रवेश करुन चोरी केल्याची तक्रार पाटील यांनी पोलिसांकडे दिली. त्यावरुन अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. 

टॅग्स :IndapurइंदापूरtheftचोरीPoliceपोलिस